आगामी काळात भोकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.
भोकर : जिल्ह्यात माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश झाला आणि येथील माजी आमदार, खासदार, बडे नेते मंडळी पक्ष प्रवेश करण्यासाठी माझ्या संपर्कात आहेत. भविष्यात आमचा पक्ष नंबर एक होईल, निवडणुकीत कार्यकर्ते तयार करा मी खंबीर पणे तुमच्या पाठीशी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत एक बैठक घेणार आहे. तेव्हा मनात किंतु-पंरतु नको, विरोधक लाडक्या बहीण योजनेचा बाऊ करीत आहे. ती योजना बंद होणार नाही, असे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांनी गुरुवारी (ता. २०) भोकर येथे सांगितले.