
बिलोली : तालुक्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून मागील तीन महिन्यांत बिलोली, कुंडलवाडी, बोधन, देगलूर, नरसी आदी मार्गांवर गंभीर आणि किरकोळ अपघातांची आकडेवारी शंभरी पार झाली असून, ६५ पेक्षा अधिक अपघातांची नोंद बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालयात झाली आहे. त्यापैकी बरेच अपघात मोबाइल वापरामुळे होत असल्याची माहिती पुढे आली आहे.