Nanded News : बिलोली आणि नांदेड येथे उभारणार अत्याधुनिक डाक भवन

Biloli News : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्यामुळे डाक भवन उभारणीसाठी मंजुरी मिळाली
Nanded News
Nanded NewsSakal
Updated on

बिलोली : जिल्ह्यातील बिलोलीसह नांदेड येथे अत्याधुनिक डाक भवन उभारावे, यासाठी केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी संसद अधिवेशन काळात मागणी केली होती. त्याला अनुसरून तत्काळ प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित विभागास सूचना केल्या होत्या. सध्या जिल्हा स्तरावरून केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला गती देऊन मंजुरी द्यावी आणि आर्थिक तरतूद करावी, यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com