नांदेडमध्ये सोमवारी एक हजार १५ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी ; २५ जणांचा मृत्यू, ९०६ व्यक्ती कोरोनाबाधित  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सोमवारी एक हजार १५ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.४६ टक्के आहे. जिल्ह्यात १० हजार ७५६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

नांदेडमध्ये सोमवारी एक हजार १५ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी ; २५ जणांचा मृत्यू, ९०६ व्यक्ती कोरोनाबाधित 

नांदेड - जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या तीन हजार सात अहवालापैकी ९०६ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ४८ हजार ५७५ एवढी झाली असून यातील ३५ हजार ६४२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला दहा हजार ७५६ रुग्ण उपचार घेत असून २०४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर आहे.
 
शुक्रवारी (ता. दोन) आणि शनिवारी (ता. तीन) या दोन दिवसांच्या कालावधीत २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ९२१ एवढी झाली आहे. सोमवारी बल्लुर ता. देगलूर पुरुष (वय ६०), आसर्जन नांदेड पुरुष (वय ७६), सुंदरनगर नांदेड महिला (वय ६८), गुरुद्वारा परिसर नांदेड पुरुष (वय ७४), हैदरबाग पुरुष (वय ७४), लोहा महिला (वय ८५), देगलुरनाका नांदेड पुरुष (वय ७१), तामसा हदगाव पुरुष (वय ५७), सहयोगनगर नांदेड पुरुष (वय ८२), विनायकनगर पुरुष (वय ७२), वामननगर पुरुष (वय ८६ ), उमरी पुरुष (वय ६३) हडको पुरुष (वय ६७), विकासनगर नांदडे पुरुष (वय ६६), फत्तेबुरुज महिला (वय ८०), फरांदेपार्क महिला (वय ४६ ), गणेश पाटीज परिसर महिला (वय ६७),वडेपुरी तालुका लोहा पुरुष (वय ६५), लोहा पुरुष (वय ६०), सिडको पुरुष (वय ८६), अरविंदनगर नांदेड पुरुष (वय ८०),वडसा माहुर महिला (वय ५५), सिडको महिला (वय ७२), शारदानगर पुरुष (वय ७२), शारदानगर नांदेड महिला (वय ७१) असे एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला. 

 शासकीय रुग्णालयात उपलब्ध खाटा

सोमवारी एक हजार १५ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.४६ टक्के आहे. जिल्ह्यात १० हजार ७५६ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. सोमवारी (ता. पाच) सांयकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे नऊ, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे सात तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे सहा खाटा उपलब्ध आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण स्वॅब- ३ लाख ३९ हजार १४४ 
एकुण निगेटिव्ह - २ लाख ८३ हजार ६७२ 
एकुण पॉझिटिव्ह - ४८ हजार ५७५ 
एकूण बरे - ३६ हजार ६५७ 
एकुण मृत्यू -९२१ 
आज प्रलंबित स्वॅब - ३७६ 
उपचार सुरू -१० हजार ७५६ 
अतिगंभीर -२०४. 


जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. 
- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Web Title: Monday 1015 Victims Were Discharged After Medical Treatment 25 Killed 906 Injured Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top