esakal | जिल्ह्यातील शंंभरापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात, बाधीत एकाची भर
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

नांदेड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १४४ इतकी झाली असली तरी, पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे हळुहळु पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी होत आहे. तर दुसरीकडे रोज एखाद्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे.

जिल्ह्यातील शंंभरापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात, बाधीत एकाची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील संशयित १९२ व्यक्तींचे तपासणीसाठी पाठविलेल्या स्वॅबपैकी १२८ अहवाल शनिवारी (ता.३०) सकाळी प्राप्त झाले असून, त्यात मिल्लतनगरमधील एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर चार रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

शहरातील लोहारगल्ली, इतवारा, कुंभारटेकडी आदी परिसरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील १९२ संशयितांचे स्वॅब शुक्रवारी (ता.२९) तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी शनिवारी सकाळी १२८ अहवाल प्राप्त झाले असून, त्यात मिल्लतनगर येथील ३२ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह सापडली. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता १४४ इतकी झाली आहे. शनिवारी नव्याने प्राप्त झालेल्या अहवालातील १३ स्वॅब नाकारण्यात आले तर पाच अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले. 

हेही वाचा- Video : लालपरीने स्विकारला माल वाहतूकीचा पर्याय    

१४४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १०३ रुग्ण बरे
शुक्रवारी सायंकाळी पाठविलेल्या स्वॅब अहवालापैकी ८१ स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. शुक्रवारी (ता.२९) एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील आठ रुग्ण व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मुखेड येथील एक रुग्ण असे एकूण नऊ पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत १४४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १०३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर उर्वरित ३३ रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील दोन स्त्री रुग्ण वय (५२ व ५५) यांची प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचा- विद्यार्थी गिरवत आहेत ऑनलाइन शिक्षणाचे धडे, कुठे ते वाचा...

आता ७८ अहवालाची प्रतिक्षा

जिल्ह्यात ३३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १९२ स्वॅबच्या तपासणी अहवालातील सकाळी १२८ रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. तर मागील दोन दिवसांत दिलेले ७८ स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. हा अहवाल शनिवारी रात्री उशिरापर्यंत येइल. - डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड

चार रुग्णांना दिली सुट्टी

शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानूसार दिवसभरात चार रुग्णांना सुट्टी देण्यात आली. यामध्ये ग्रामीण रुग्णालय भोकर येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुखेड दोन तर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातून एक अशा एकूण चार रुग्णांना सुट्टी देण्यात आली.

नांदेड कोरोना मीटर

एकुण पॉझिटिव्ह - १४४
उपचार सुरु - ३३
उपचार घेत घरी परतलेले - १०३
मृत्यू - आठ