esakal | Motivational Story:जिद्दीने गाठले यशाचे शिखर; नांदेडच्या शेतकऱ्याची मुलगी निमलष्करी दलात 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शुरता, साहस, शौर्य हे शब्द उच्चारले की महापुरुषांच्या व्यक्तिरेखा समोर उभ्या टाकतात

Motivational Story:जिद्दीने गाठले यशाचे शिखर; नांदेडच्या शेतकऱ्याची मुलगी निमलष्करी दलात 

sakal_logo
By
विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड) : जिद्द, चिकाटी व प्रामाणिक परिश्रमाच्या जोरावर धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील गंगाधर मुपडे या शेतकर्‍याच्या मुलीने जिद्दीने यशाचे शिखर गाठले आहे. जयश्री गंगाधर मुपडे ही शेतकऱ्याची मुलगी निमलष्करी दलात दाखल झाली असून आसाम राज्यामध्ये ती नुकतीच प्रशिक्षणासाठी रवाना झाली आहे.

शुरता, साहस, शौर्य हे शब्द उच्चारले की महापुरुषांच्या व्यक्तिरेखा समोर उभ्या टाकतात. शिवाय सीमावर्ती भागातील सैन्यदल व लष्करात पुरुषांच्याच भरणा अधिक असतो. मात्र मुलीही कशात कमी नसतात. मुलींमध्ये अफाट शक्ती असते मात्र त्याची योग्य दखल घेतली जात नाही. परंतु एका शेतकरी बापाने आपल्या मुलीच्या करियरकडे वैयक्तिक लक्ष दिले. ज्यामुळे त्यांची मुलगी आज निमलष्करी दलांमध्ये दाखल होऊ शकली.

बिलोली तालुक्याच्या सीमालगत असलेल्या धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील जयश्री गंगाधर मुपडे ही बालवयापासूनच अत्यंत बुद्धिमान होती. प्राथमिक माध्यमिक शिक्षण तालुक्यातच पूर्ण करून पदवीचे शिक्षण घेऊन ती स्पर्धापरीक्षेची तयारी करू लागली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा तिने दिल्या त्यातूनच तिला अनुभव आला व यशाचा मार्ग सापडला. गतवर्षी कोरोना काळ असतानाही केंद्रीय कर्मचारी निवड आयोगाने पॅरामिलिटरी फोर्सच्या निवडीसाठी परीक्षा घेतल्या होत्या. त्या परीक्षेचा निकाल जानेवारी २०२१ मध्ये जाहीर करण्यात आला. त्यात जय गंगाधर मुपडे ही उत्तीर्ण झाली. दोन महिन्यातच निमलष्करी दलाच्या माध्यमातून तिला देशसेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. आसाम राज्यामध्ये एक एप्रिलपासून निमलष्करी दलाच्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले असून त्यात ती सहभागी झाली आहे.

तिच्या यशाचे श्रेय ती आपल्या आई- वडिलांना तसेच नातेवाईकांना देते. तिच्या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, सुरेश अंबुलगेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार, माजी नगराध्यक्ष नागनाथ तुम्मोड, गोविंदराव रामोड, बळीराम ईरलेवाड, जयश्रीची बहिण रेणुका गजानन शाहू, शोभा सुरेश कवडेवार, व्यंकट पंढरी सब्बेनवाड, नागनाथ सब्बेनवाड, बालाजी इसलवार आदींनी तिच्या यशाचे कौतुक करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जयश्रीचे वडील गंगाधर मुपडे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मोठ्या मुलीचे लग्न झाले. उर्वरित दोन भावंडांना देशसेवेसाठी पाठवावे यांचे वेड लागल्याने त्यांनी जयश्री व मुलाला लष्करी दलाची शिक्षण देणे सुरु केले. जयश्री निमलष्करी दलात दाखल झाली याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत आहे.  मुलगाही पोलिस दलात दाखल होण्यासाठी परिश्रम घेत आहे. मुलगी निमलष्करी दलात दाखल झाल्याचा आनंद गंगाधर व त्यांच्या पत्नीला गगनात मावेनासा झाला आहे. मुलगी ही मुलाएवढीच सरस असू शकते त्यामुळे मुलांमध्ये भेदभाव हे चुकीचे असल्याचे मत श्री मुपडे यांनी व्यक्त केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image