नायगाव : नरसी-मुखेड रस्त्यावर कोपरा पाटीजवळ दुचाकी व टेंपो अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली..तालुक्यातील बेंद्री येथील दिलीप जयवंतराव कदम व नरसी येथील शिवाजी हनमंतराव ताटे हे दोघे दुचाकीवरून गुरुवारी सायंकाळी नरसीकडे येत होते तर टेंपो क्र (एमएच २५/ ए.के. ७७०७) नरसीकडून मुखेडकडे जात होता..दोन्ही वाहनांची खंडगाव शिवारात कोपरा पाटीजवळ समोरासमोर धडक झाली. यात बेंद्री येथील शिवाजी कदम (३८) हे जागीच ठार झाले तर दुचाकीवर मागे बसलेले शिवाजी ताटे हे गंभीर जखमी झाले..नागरिकांनी या दोघांनाही नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ताटे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले..Nanded Accident : विचित्र अपघातात एक ठार, दोन जखमी; टॅंकरमधील पाच हजार लिटर पेट्रोलची गळती.मृत दिलीप कदम यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.