महावितरण : ग्रामीण भागात एक गाव- एक दिवस अभियानाला प्रतिसाद

प्रल्हाद कांबळे
Friday, 27 November 2020

पंधरा दिवसात 413 गावात एकाच दिवशी अनेक समस्यांचा केला निपटारा ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले, तर 920 वीजग्राहकांनी केले 18 लाखांचे वीजबील जमा मुख्य अभियंता, अधिकारी व ठेकेदारांसह  2577 कर्मचाऱ्यांचा सहभाग

नांदेड : ग्राहकाभिमूख वजिसेवा देण्याच्या अनुशंगाने गावातील विजेच्या सर्व समस्यांचा निपटारा एकाच दिवशी करून ग्राहकाला सार्वोभौम मानून एक गाव एक दिवस ही संकल्पना नांदेड परिमंडळाच्या अंतर्गत केवळ पंधरा दिवसात 413 गावांमध्ये राबवण्यात आली. या मोहिमेत मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व ठेकेदार यांच्यासह 1626 जनमित्रांनी तर 951 बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने यशश्वीपणे राबवण्यात आली आहे. देखभाल दुरूस्तीसह 1054 वीजबिलांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले तर 920 वीजग्राहकांनी 18 लाख 28 हजार 450 रूपयांचे वीजबील जमा केले आहे.

ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्या संकल्पनेतून संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये राबविण्यात येत आहे. वीज ग्राहकांना दर्जेदारव सुरळीत वीजपुरवठा करणे, वितरण प्रणालीची नियमीतपणे देखभाल दुरूस्ती करणे, नवीन वीजपुरवठा देणे, वीज देयकांच्या तक्रारींचे निवारण करून नियमीतपणे भरणा करून घेणे अशा प्रकारची कामे एकाच दिवशी करून घेतली जात आहेत.

यासाठी संबंधीत गावातील व वॉर्डामधील लोकप्रतिनीधी तसेच वीजग्राहकांशी उपक्रम राबविण्यापुर्वी संवाद साधून त्याच्या समस्या जाणून घेण्याचे काम संबंधीत शाखा कार्यालयाचे अभियंता व जनमित्रांच्या वतीने केले जात आहे. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता डी. व्ही. पडळकर नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे, हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव तसेच परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे यांच्या निर्देशानुसार एक गाव-एक दिवस हे विशेष अभियान राबविण्यास 11 नोव्हेंबरपासून नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात राबविण्यास सुरवात झाली आहे. प्रत्यक्ष मुख्य अभियंता या अभियानात सहभागी झाल्यामुळे कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये मध्ये उत्साह निर्माण झाला परिणामी देखभाल दुरूस्तीच्या कामात आणि वीजदेयक वसुलीत ग्रामस्थ् सहभागी होत आहेत.

हेही वाचा महाआघाडीच सरकार जास्त दिवस टिकणार नाही- पंकजा मुंडे

या विशेष अभियाना अंतर्गत वीजग्राहकांच्या समस्या जाणून घेत ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी नांदेड जिल्हयातील भोकर विभागातील 59 गावामध्ये. देगलूर विभागातील 44, नांदेड शहर विभागातील 33 तर नांदेड ग्रामीण विभागातील 88 अशाप्रकारे एकूण 224 गावामधे अभियान राबवत 509 वीजग्राहकांच्या वीजबिलांच्या तक्रारी जागेवरच सोडवण्यात आल्या. त्याचबरोबर परभणी जिल्हयातील 71 गावामधे हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये परभणी विभाग क्रमांक एक मध्ये 33 तर परभणी विभाग क्रमांक दोन मध्ये 38 गावामध्ये दुरूस्तीची कामे करत 296 वीजग्राहकांच्या वीजबिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. हिंगोली जिल्हयातही 118 गावामधे एक गाव-एक दिवस हा उपक्रम राबवत 249 वीजग्राहकांच्या वीजबिलांसंबधी तक्रारी जागेवरच सोडवण्यात आल्या.

एक गाव एक दिवस अभ्यिानात केलेली कामे-

डीपीवरील कीटकॅट  व केबलची दुरूस्ती, गावातील खराब झालेले पोल बदलणे, लोंबकळणाऱ्या तारा ओढणे, गावात झालेल्या अपघात प्रवण ठिकाणाची दुरूस्ती, वाकलेले पोल सरळ करणे, कृषीपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या रोहीत्रांची देखभाल. लघूदाब, उच्चदाब वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या कापणे, नवीन वीज जोडणी त्याचबरोबर वीजबिलांबाबतच्या तक्रारींचे निरसन

थकीत व चालू वीजबील भरावे असे आवाहन

एक गाव एक दिवस हे अभियान पुढील किमान देान महिणे सुरू राहणार असून वीजगाहकांनी दुरूस्तीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यास सहकार्य करावे. त्याचबरोबर आपले थकीत व चालू वीजबील भरावे असे आवाहन मुख्य अभियंता डी. व्ही.पडळकर यांनी केले आहे.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL: Response to One Village-One Day Campaign in rural areas nanded news