esakal | मुदखेडचे पोलिस निरीक्षक निकाळजे यांनी अनाथाश्रमातील बालकांसोबत केली दिवाळी साजरी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सूनील निकाळजे  हे मुदखेड पोलीस स्थानकात नांदेड जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून लाभले असून त्यांनी आपल्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातील अनेक मोठाली गुन्हे उघडकीस आणून अनेक गुन्हेगारांना पुराव्यानिशी न्यायालयापुढे उभे केले यामध्ये अनेक गुन्हेगारांना शिक्षाही झाली

मुदखेडचे पोलिस निरीक्षक निकाळजे यांनी अनाथाश्रमातील बालकांसोबत केली दिवाळी साजरी

sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी यावेळची दिवाळी व आपला वाढदिवस मुदखेड येथील आस्था अनाथ बालक आश्रमातील बलकांसोबत मिठाई व मिष्ठान्न भोजन देऊन साजरा केला.

सूनील निकाळजे हे मुदखेड पोलिस स्थानकात नांदेड जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून लाभले असून त्यांनी आपल्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातील अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणून अनेक गुन्हेगारांना पुराव्यानिशी न्यायालयापुढे उभे केले. यामध्ये अनेक गुन्हेगारांना शिक्षाही झाली. त्यामुळे गुन्हेगारांचा पर्दाफाश करणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची नांदेड जिल्ह्यामध्ये मोठी ओळख आहे. त्यांनी नांदेड क्राईम ब्रँच ला चांगले काम केले होते. त्याबद्दल त्यांचा पोलिस विभागामार्फत अनेक वेळा गौरवही झाला.

हेही वाचा -  सोशल मीडियावर शेतकऱ्याने केली जाहिरात; अन थेट शिवारातूनच होतेय सिताफळाची विक्री !

मागील काही दिवसापासून मुदखेड पोलिस स्टेशनचा कारभार पोलिस निरीक्षक सूनील निकाळजे हे पहात असून त्यांनी कार्यरत असलेल्या पोलीस स्थानकाअंतर्गत गुन्हेगारांवरती चांगलाच वचक बसवलेला असून नुकताच मुदखेड शहरात सराफा व्यापाऱ्यावरती झालेल्या हल्ल्यातील दरोडेखोरांना त्यांनी मुसक्या आवळून जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. यांचा ता.१६ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त व दिवाळी असल्यामुळे त्यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना समवेत मुदखेड येथील आस्था बालक आश्रमामध्ये जाऊन या अनाथ बालकांना मिठाई व मिष्ठान्न वाटप करून या अनाथ बालकांची दिवाळी गोड केली व या बालकांसोबत अनाथआश्रममध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना समवेत वेळ घालून अनाथ बालकांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी पोलिस कर्मचारी व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे