esakal | साडेचार लाखाच्या गुटख्यासह साडेआठ लाखाचा ऐवज जप्त- मुदखेड पोलिस 

बोलून बातमी शोधा

file photo

हिमायतनगरहुन नांदेडकडे जाणारा सुगंधित पान मसाला व प्रिमीयम जाफराबादी जर्दा एका पीकप गाडीमधू जात होता. आलेल्या वाहनाला थांबवून चौकशी केली असता त्यात आठ लाख ६२ हजाराचा ऐवज जप्त केला.

साडेचार लाखाच्या गुटख्यासह साडेआठ लाखाचा ऐवज जप्त- मुदखेड पोलिस 
sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड  (जिल्हा नांदेड) : कोरोना काळात मागील अनेक दिवसांपासून मुदखेड मार्गे सुगंधित जर्दा, पान मसाला, गुटखासह इतर वस्तूंची हिमायतनगर, किनवट व आंध्र प्रदेशातून नांदेड शहराकडे तस्करी होत असल्याची माहिती मुदखेड पोलिसांना मिळाली. यावरुन मुदखेड पोलीसांनी तस्करीच्या मागावर असताना मिळालेल्या माहिती वरून त्यांनी हिमायतनगरहुन नांदेडकडे जाणारा सुगंधित पान मसाला व प्रिमीयम जाफराबादी जर्दा एका पीकप गाडीमधू जात होता. आलेल्या वाहनाला थांबवून चौकशी केली असता त्यात आठ लाख ६२ हजाराचा ऐवज जप्त केला. आरोपींविरुद्ध मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शुक्रवारी (ता.३१) रोजी दुपारी पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, उपनिरीक्षक उत्तम बुक्‍तरे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदेड रोडवर सापळा रचून हिमायतनगर येथून नांदेडकडे जाणारा बोलेरो महिंद्रा पीकअप मालवाहू (एम एच२६- ०९२५) हे वाहन ताब्यात घेऊन पाहणी केली. यावेळी चालकाला यात काय माल आहे याची विचारणा केली असता त्यात निरमा व अन्य सामान दिसले. परंतु चालकाची बोबडी वळत असल्याने पोलिसांना संशय आला. पुन्हा या वाहनाची समोरील भागातून पाहणी केली असता त्यात १८ पोते विविध कंपनीचा गुटखा आढळून आला. 

चार लाख ६२ हजाराचा गुटखा

शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी शरीर व आरोग्यास अपायकारक असलेला सुगंधित पान मसाला, जर्दाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आला. या मालाचा बाजारभाव चार लाख ६२ हजार रुपये किंमतीचा माल व चार लाख रुपये किंमतीचे एक वाहन असा एकूण आठ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्क पोलिस निरीक्षक श्री. भाले यांनी तक्रार दिली. यावरुन मुदखेड पोलिस ठाण्यात अब्दुल इमरान अब्दुल हमीद (वय २५वर्ष), शेख अमीन शेख अलम (२८ वर्ष) आणि शेख अमिन शेख आलम (२८ वर्ष) सर्व रा. हिमायतनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाच्या जप्त गुटखा स्वाधीन केला.  

तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले हे करीत आहे

सदरील कारवाईत मुदखेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुक्‍तरे, बलवीर ठाकूर, विनायक मठपती, शिवानंद कानगुले आदींनी कारवाई केली सदरील गुन्हायाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले हे करीत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे