esakal | वाका येथे अंगणात झोपलेल्या तरुणाचा गळा चिरुन खून; लोहा तालुक्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

वाका खून

वाका येथे अंगणात झोपलेल्या तरुणाचा गळा चिरुन खून; लोहा तालुक्यातील घटना

sakal_logo
By
गणेश ढेपे

मारतळा ( जिल्हा नांदेड ) : लोहा तालुक्यातील वाका येथे घरासमोरील अंगणात झोपलेल्या (House ground sleeping) एका तरुणाची अज्ञातांकडून धारदार शस्त्राने गळ्यावर सपासप वार करुन खून करण्यात (Murder) आल्याची घटना शनिवारी (ता. १५) च्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात (Usmanabad police station) घटनेची नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी घटनास्थळास भेट दिली आहे. (Murder by slitting the throat of a young man sleeping in the courtyard at Waka; Incidents in Loha taluka)

वाका येथील तरुण वचिष्ठ किशन खोसे ( वय ३५) हा तरुण नेहमीप्रमाणे शनिवारी (ता. १५ ) मे च्या रात्री जेवण करुन उकाड्याचा त्रास होऊ लागल्याने आपल्या अंगणात झोपला होता. याच दिवशी मध्यरात्रीनंतर काही अज्ञात व्यक्तीकडून गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्याचा खुन केला. मात्र ही माहिती घरात पंखे लावून गाढ झोपेत असलेल्या त्यांची आई, पत्नी व मुलांना या हत्येची पुसटशी ही कल्पना नव्हती. मात्र सकाळी उठून पाहतात तर काय आपला वचिष्ठ रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत दिसताच नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला व रडारड सुरु झाली.

हेही वाचा - दारुच्या नशेत असलेल्या दोन भाच्यांनी मामीला केलेल्या मारहाणीत मामीचा जागीच मृत्यू

ही माहिती स्थानिक नागरिकांनी उस्माननगर पोलिसांना दिली. देगलूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. उस्माननगर पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. उस्माननगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. डी. भूसनूरे, फौजदार बाबासाहेब थोरे यांनी घटनास्थळ पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले होते. दोन महिन्यापूर्वीच मयताचे मेहुणे आनंदा झोटलींग ( वय २० ) या तरुणावरही शेतात आखाड्यावर झोपला असताना अज्ञाताने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे