नांदेड शहरात जथ्थेदार संत बाबा संतोकसिंग यांचा निर्घृण खून

file photo
file photo

नांदेड : महाशिवरात्रीची पहाट नांदेड शहरात एका संताच्या खुनामुळे निराशाजनक ठरली. गुरुद्वारा नगिनाघाट साहीबच्या मागे असलेल्या एका गुरुद्वारातील जथ्थेदारांचा खून गुरुवारी (ता. ११) पहाटे अडीच ते तीनच्या वेळेत घडला. मारेकऱ्यांनी रोख रक्कम व दुचाकी लंपास केल्याचा प्राथमीक अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

गुन्हा घडल्यानंतर मारेकरी दुचाकीवरुन पसार झाल्याचे सांगण्यात आले. गुरुवारचा सूर्योदय होण्याअगोदरच गुरुद्वारा लंगर साहीबच्या पाठीमागे जथ्थेदार संत बाबा संतोकसिंग नेहंग यांचा गुरुद्वारा आहे. पहाटे तीनच्या सुमारास गुरुद्वारातील सेवक गुरमीतसिंग उर्फ बादल देवेंद्रसिंग महाजन यांनी संत बाबा संतोकसिंग यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. 

याबाबतची माहिती त्यांनी आपल्या इतर साथीदारांसह वजिराबाद पोलिसांना दिल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, पोलिस उपाधिक्षक विक्रांत गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, वजिराबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. संत बाबा संतोकसिंह यांच्या पाठीवर, मानेवर तलवारीने जबर मारण्यात आले होते. आणि त्यांचा मृतदेह तेथेच पडलेला होता. पोलिसांनी पुढील वैद्यकीय तपासणीसाठी बाबा संतोकसिंग यांचा मृतदेह विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात गुरमीतसिंग महाजन यांच्या तक्रारीवरुन अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत असून सेवेकऱ्यांनी सांगितल्यानुसार संत बाबांची एक दुचाकी गाडी आणि काही रक्कम लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com