
उत्तम मरीबा कांबळे यांच्या फिर्यादीवरुन गुरुवारी (ता. एक) पतीसह तिघांना अटक करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंधारमध्ये विवाहितेचा गळा आवळून खून; पतीसह तिघांना पोलिस कोठडी
नांदेड : अॅटो खरेदीसाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी नेहमी मारहाण करणाऱ्या पती व सासरकडील मंडळींनी विवाहितेचा स्कार्पने गळा आवळून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी (ता. ३१) दुपारी बहादरपुरा (ता. कंधार) येथे घडली. उत्तम मरीबा कांबळे यांच्या फिर्यादीवरुन गुरुवारी (ता. एक) पतीसह तिघांना अटक करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंधार तालुक्यातील पानभोसी येथील दुर्गा उत्तम कांबळे (वय 21) बहादरपूर येथील ज्ञानोबा नागोराव गायकवाड यांच्याशी काही वर्षापूर्वीच लग्न झाले होते. दुर्गाला एक मुलगी आहे. दोन महिन्यापूर्वी माहेराहून पैसे घेऊन ये असा तगादा पतीसह सासरकडील मंडळींनी लावला होता. यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जायचा.
हेही वाचा - नांदेड : वाहतूक नियमांचे पालन करुन अपघात टाळा- महामार्गचे पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे
अखेर पती, सासरा व दिराने संगनमत करुन दुर्गाचा गळा आवळून खून केला. या प्रकरणात ज्ञानोबा नागोराव गायकवाड (वय 22), नागोराव गायकवाड वय 42 ) आणि दीराविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्यांना अटक केली. कंधार पोलिसांनी या तिघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठविले आहे. तपास पोलिस निरीक्षक एस. जाधव करीत आहेत.
Web Title: Murder Married Woman Kandhar Police Custody Three Including Husband Nanded News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..