नायगावचे आमदार राजेश पवार यांना रामदास आठवलेंचा विसर

आमदार राजेश पवार यांनी व त्याच्या काही चाहत्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या वर्तमानपत्रातील जाहिराती व मतदार संघात लावण्यात आलेले होर्जींग्जवर भारतीय जनता पक्षाच्या तालुकास्तरीय सर्वसाधारण कार्यकर्त्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंतचे फोटो लावण्यात आलेत.
आमदार राजेश पवार
आमदार राजेश पवार

नांदेड : नायगाव विधानसभा मतदारसंघाचे रिपाई (आठवले गट) आणि भाजप पुरस्कृत आमदार राजेश पवार (Mla Rajesh pawar) यांचा शुक्रवारी (ता. १४) वाढदिवस. परंतू त्यांना ज्यांच्या कोट्यातून आमदारकी मिळाली असे ते केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले होत. परंतू आमदार पवार यांनी नामदार आठवलेला (Ramdas Aathvale) सोयीस्कर बाजूला केले. वर्तमानपत्रात प्रकाशीत केलेल्या जाहिराती आणि आपल्या मतदार संघात झळकलेल्या होर्डींग्जवर (birthday) नामदार आठवले यांना जागा दिली नसल्याने आठवले गटाच्या कार्यकर्त्यांमधून नाराजगी पसरली आहे. (Naigaon MLA Rajesh Pawar forgets Ramdas Athavale)

आमदार राजेश पवार यांनी व त्याच्या काही चाहत्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या वर्तमानपत्रातील जाहिराती व मतदार संघात लावण्यात आलेले होर्जींग्जवर भारतीय जनता पक्षाच्या तालुकास्तरीय सर्वसाधारण कार्यकर्त्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंतचे फोटो लावण्यात आलेत. मात्र त्यांना रामदास आठवले यांच्या फोटोला त्यांनी आपल्या होर्डींग्जवर जागा दिली नाही. त्याबद्दल मतदार संघात वेगळ्याच चर्चेला उत आला आहे.

हेही वाचा - कोरोना पार्श्वभूमीवर अनाथ बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी टास्क फोर्स

आमदार राजेश पवार हे उच्चशिक्षीत असून ते पूणे येथील शिवाजी मिलिटरी स्कूलमधील विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या नेत्याला स्थान देणे अपेक्षीत होते. परंतु तसे झाले नसल्याचे दिसून येते आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे वडिल स्वर्गीय संभाजी पवार यांच्या सहवासात वाढले. त्यांच्या बोटाला बोट धरुन राजकारण शिकले. त्यांनी सर्वप्रथम 2014 मध्ये नायगाव मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढली. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. पुन्हा त्यांनी सन २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कोट्यातून त्यांनी नायगाव मतदार संघातून निवडणूक लढवली. आणि या निवडणुकीत ते विजयी झाले. निवडणूक काळात त्यांनी आपल्या खांद्यावरील निळा रुमाल खाली पडू दिला नाही. मात्र निवडून येताच त्यांनी प्रचारासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांना झिडकारले. एवढचे नाही तर एकाही विकास कामाच्या भूमीपुजनासाठी किंवा महत्वाच्या कार्यक्रमात त्यांना स्थान दिले नाही.

त्यानंतर काही दिवसातच मतदारसंघातील अवैध वाळू उपसा करणारे आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्याशी पंगा घेतला. त्यानंतर हे दोन्ही गट आमदारांच्या विरोधात गेले. पुढे आमदार महोदयांनी पोलिस विभागाशीही जमवून घेतले नाही. उमरीसारख्या ठिकाणी असलेल्या पोलिस निरीक्षकाच्या बदलीसाठी त्यांना खूप आटापिटा करावा लागला. त्यानंतर कुंटुर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकास हटविण्याचा त्यांचा डाव फसला. एकापाठोपाठ मतदारासंघातील नागिरक, मतदार, व्यापारी, कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर जात असल्याचे चित्र पहावयास मिळते.

त्यात पुन्हा भर म्हणून वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या होर्जींग्जवर रामदास आठवले यांचे छायाचित्र वापरले नसल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजगी पसरली आहे. त्यांच्याबद्दल मतदारसंघात सध्या वातावरण दूषित असले तरी वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. हा संदेश सोशल माध्यमावर व्हायरल होत असून ज्यांच्यामुळे आमदारांची खुर्ची मिळाली त्यांनाच आमदार पवार यांनी बाजूला सारले. येणाऱ्या काळात हा प्रकार त्यांना महागात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राजेश पवार यांनी पक्षाशी इमानदारी ठेवली नाही

आमदार राजेश पवार यांच्या निवडणूकीत रिपब्लीकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन त्यांना निवडून आणले. निवडून आल्यानंतर ते पक्षाला व कार्यकर्त्याला मदत करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी स्रवच कार्यकर्त्यांना दूर ठेवले. ज्यांच्यामुळे आमदारकी मिळाली ते राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनाहीते विसरतील असे वाटले नव्हते. त्यांनी पक्षाशी व कार्यकर्त्यांशी इमानदारी ठेवली नाही. असा आरोप रिपाई (आठवले गट) चे प्रदेश उपाध्यक्ष विजय सोनवने यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com