नायगाव तालुक्यात मतदारांनी आमदार रातोळीकरांना तारले तर आमदार पवारांना ठोकरले

file photo
file photo

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : सोमवारी झालेल्या मतमोजणीत मतदारांनी अनेक प्रस्थापितांना धक्का दिला आहे त्यामुळे अनेक गावांतील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. रातोळीत आमदार रातोळीकरांनी एकहाती सत्ता मिळवली तर आमदार राजेश पवार यांना गावातील मतदारांनीच हात दिला. दुसरीकडे नरसीत श्रावण भिलवंडे हे नरसीचे बाजीगर ठरले आहेत. कुष्णूरमध्ये जिल्हा परिषद सदस्य सौ. विजयश्री कमठेवाड यांच्या गटाचा पराभव झाला. शेळगावमध्ये स्वच्छता दुत माधवराव पाटील शेळगाकरांना पराभवाचा धक्का बसला आहे. घुंगराळ्याचा गड टिकवण्यात वसंत सुगावे यांना यश आले असून. तालुक्यातील बहुतांश गावात माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या गटाची सत्ता आली आहे.

नायगाव तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीसाठी ता. १५ रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी येथील तहसील कार्यालयात झाली. १२ टेबलवर मतमोजणीच्या १७ फेऱ्या झाल्या झाल्या. यात तालुक्यातील अनेक प्रस्थापितांना मतदारानी झटका दिला. त्याचबरोबर तरुणाईनेही गावातील पारंपरिक प्रस्थापितांच्या समोर मोठे आवाहन निर्माण केल्याने निवढणुकी अटीतटीच्या व लक्षवेधी ठरल्या होत्या. त्यामुळे बेटकबिलोली येथे ८ जागा बिनविरोध निघाल्या असतांनाही सरपंच पदासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अपक्ष उमेदवार जनाबाई रोडे या ६० मतांनी विछय मिळवून राहूल नकाते यांचे राजकीय समिकरण बिघडून टाकले आहे. 

तालुक्यातील अंचोली ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. यात दोन सख्खे चुलत भाऊ एकदुसऱ्याच्या विरोधात मैदानात होते. खा. चिखलीकरांचे विरोधक असलेले सुनील मोरे यांनी सर्वच्या सर्व ७ ही जागावर एकतर्फी विजय मिळवल्याने मागच्या दहा वर्षांपासूनची खा. चिखलीकर समर्थकांचा अतिशय दारुण पराभव झाला आहे. आ. राजेश पवार समर्थक असलेले भाजपा नेते अशोक पाटील मुगावकर यांच्या गटाचा मुगावमध्ये दारुन पराभव झाला असून सर्वच्या सर्व जागावर वसंत चव्हाण समर्थकांनी जिंकल्या आहेत.  टाकळीत भाऊबंदकीमुळे टाकळीकरांच्या गटाचा पराभव झाला असून पुतण्याने विजयी सलामी दिली आहे. 

तणावपूर्ण वातावरणात निवडणूक झालेल्या खंडगावमध्ये सुरेश कदम यांच्या गटाला बहूमत मिळाले आहे. मागच्या पाच वर्षापासून भ्रष्टाचाराच्या कारणावरुन चर्चेत असलेल्या गडगा ग्रामपंचायतीवर शिवा पाटील गडगेकर यांच्या गटाचे ८ सदस्य विजयी झाले असून. २५ वर्षानंतर माली पाटलांनी गावावर वर्चस्व मिळवण्यात यश आले आहे. सोमठाणा येथे पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पवार यांना मतदारांनी नाकरले असून साहेबराव सोमठाणकर यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. रानसुगाव येथील अटीतटीच्या निवडणुकीत सरपंच पदाणे दावेदार असलेले पती गोविंद संग्रपवार हे विजयी झाले असून त्यांच्या पत्नीचा मात्र पराभव झाला. नांदेड जिल्ह्यातील नामांकित बिल्डर असलेले. संजय बियाणी यांनी कोलंबीचा गड पुन्हा एकदा राखला असून ११ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत. होटाळकर यांनीही होटाळ्यात एकहाती सता मिळवली आहे. 

दुसरीकडे नरसीत श्रावण भिलवंडे हे नरसीचे बाजीगर ठरले आहेत. १७ पैकी १३ त्यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.  कुष्णूरमध्ये जिल्हा परिषद सदस्य सौ. विजयश्री कमठेवाड यांच्या गटाचा पराभव झाला. नव्याने राजकारण आलेल्या वकीलांनी बाजी मारली आहे. शेळगावमध्ये स्वच्छता दुत माधवराव पाटील शेळगाकरांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांची मागच्या २५ ते ३० वर्षांपासूनच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. घुंगराळ्याचा गड टिकवण्यात वसंत सुगावे यांना यश आले. नायगाव तालुक्यात मतदारांनी प्रस्थापितांच्या विरोधात कौल दिला असून अनेक ग्रामपंचायतीवर नवख्या तरुणांनी वर्चस्व मिळवले असतांना रातोळीत आ. रातोळीकरांनी रातोळीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून. बिनविरोध ६ सदस्य निवडून आल्यानंतर ५ सदस्य मतदानानंतर विजयी झाले आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com