esakal | नांदेड : मुदखेड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीसाठी १, १०३ उमेदवारी अर्ज वैध

बोलून बातमी शोधा

file photo}

गोपाळवाडी, हीस्सा पाथरड, महाटी ग्रामपंचायत होणार बिनविरोध

नांदेड : मुदखेड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीसाठी १, १०३ उमेदवारी अर्ज वैध
sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड तालुक्यातील ग्राम ग्रामपंचात निवडणुकांना मागील कांही दिवसांपासून चांगलाच वेग आलेला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रभागांसाठी एक हजार १०३ जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत. ऑनलाईनमध्ये ता. २३ डिसेंबर पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. ता. २४ डिसेंबर रोजी ता. २७ व २८ डिसेंबर रोजी १२०, ता. २९ डिसेंबर रोजी ३७३ , ता. ३० डिसेंबर रोजी ३० नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आले आहेत. तालुक्यातील बारडचे सर्वाधिक ७५ तर मुगट येथील ५२, दोन मोठ्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार असल्याचे आता निश्चितच झाले आहे.

नामनिर्देशन पत्राबाबतच्या अहवालानुसार बारड येथून ७५, पार्डी वैजापूर मधून २०, पिंपळकौठा ( चोर ) २०, माळकौठा ४३, खुजडा १६, निवघा ३६, आमदुरा १४, चिलपिंपरी १२, पिंपळकौठा मगरे २९, बोरगाव नाद्री १९, जवळा फाटक २३, हिस्सा पाथरड ७, खांबाळा १४, कोल्हा १९, चिकाळा २४, गोपाळवाडी ७, पांगरगाव १०, रोहिपिंपळगाव तांडा १८, वाडी नियमतुल्लापूर येथून २४ दाखल करण्यात आले आहेत. तसेच टाकळी १८, राजवाडी २४, डोंगरगाव ३१, पाथरड येथून १८, वाडी मुकत्यारपूर २४, मुगट ५२, धनज १८, वाडी मुक्ताजीमधून २४, रोहिपिंपळगाव ३८, शंखतिर्थ २०, तिरकसवाडी १९, शेंबोली २२, डोणगाव ३१, इजळी २४, देवापुर येथून २५, कामळज ३४, महाटी दरेगाव २५, पांढरवाडी ३२, वैजापूर पार्डी १२, सरेगाव २९, जवळा मुरहार २३, हज्जापूर १२, वासरी ३४, दरेगाव बाडी १९, मेंडकाकरिता ३३ याप्रमाणे उमेदवारांनी आपल्या गावची सत्ता हाती घेण्यासाठी नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील वाळूघाटांच्या लिलावाला अखेर मुहुर्त

निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी हे घेत आहेत परिश्रम

मुदखेड तालुक्यातील ४५ गावची निवडणूक प्रक्रिया सुरळीत व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुदखेडचे तहसीलदार दिनेश झाम्पले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संजय भोसीकर, नायब तहसीलदार संजय नागमवाड, शिवाजीराव जोगदंड, पेशकार व्यंकटेश खानसोळे, मठपती, विनोद मनवर यांच्यासह महसूल व अन्य प्रशासकीय यंत्रणेचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

या तीन ग्रामपंचायत होनार बिनविरोध

तीन ग्रामपंचायती बिनविरोध तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये गोपाळवाडी, हिस्सा पाथरड आणि बहुचर्चित असलेल्या महाटी या ३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे