नांदेडला सोमवारी ११८ पॉझिटिव्ह; दिवसभरात ११३ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू 

शिवचरण वावळे
Monday, 24 August 2020

रविवारी (ता.२३) आरटीपीसीआर व अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात आली. आरटीपीसीआर मध्ये ६७ आणि अँटीजेन टेस्ट ५१ असे एकुण ११८ जण बाधित आढळून आले आहेत.

नांदेड : जिल्हा आरोग्य विभागाकडून सोमवारी (ता.२४) प्राप्त झालेल्या ५४५ अहवालापैकी ३५९ अहवाल निगेटिव्ह आले. ११८ स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले. शासकीय रुग्णालयातील तीन व जिल्हा रुग्णालयातील दोन अशा एकूण पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

रविवारी (ता.२३) आरटीपीसीआर व अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात आली. आरटीपीसीआर मध्ये ६७ आणि अँटीजेन टेस्ट ५१ असे एकुण ११८ जण बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या पाच हजार १५० इतकी झाली आहे. दुसरीकडे शहरातील पंजाब भवन कोविड सेंटर मधील ७१, जिल्हा रुग्णालय कोविड सेंटर दोन, हदगाव कोविड सेंटर चार, लोहा कोविड सेंटर पाच, मुदखेड कोविड सेंटर सात, देगलूर जैनक कोविड सेंटर १९, गोकुंदा कोविड सेंटर एक आणि खासगी रुग्णालयातील चार असे एकुण ११३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत तीन हजार ३२८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

हेही वाचा- पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या गडाला धक्का, मुदखेड पंचायत समितीचे सभापती वंचितच्या गळाला ​

यांचा उपचारा दरम्यान मृत्यू

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील पुरुष (वय ६५), शक्तीनगर नांदेड महिला (वय २५), शिवाजीनगर नांदेड पुरुष (वय ७८), जिल्हा रुग्णालय कोविड सेंटर मधील सहयोगनगर येथील पुरुष (वय ६५), प्रगतीनगर पुरुष (वय ६८) असे पाच बाधित रुग्ण उपचारादरम्यान दगावले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील मृत्यूची संख्या १८८ इतकी झाली आहे. सोमवारी २६८ स्वॅबची तपासणी सुरु होती. त्याचा मंगळवारी सायंकाळपर्यंत अहवाल प्राप्त होणार असून, १४३ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली. 

तालुकानिहाय सोमवारी आढळलेले रुग्ण 

नांदेड शहर - ३१, नांदेड ग्रामीण- एक, नायगाव - दोन, देगलूर - पाच, कंधार - दोन, धर्माबाद - तीन, अर्धापूर - १३, लोहा -सहा, किनवट -सहा, हदगाव - आठ, मुखेड - २५, बिलोली - चार आणि हिंगोली - दोन अशा एकूण ११८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

हेही वाचा- दूर्दैवी घटना: महिला पोलिस रस्ता अपघातात ठार ​

नांदेड कोरोना मीटर 

एकूण सर्व्हेक्षण - एक लाख ५१ हजार १६४ 
एकूण घेतलेले स्वॅब - ३५ हजार २५८ 
एकूण निगेटिव्ह स्वॅब - २८ हजार ७८ 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - पाच हजार १५० 
आज सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ११८ 
आज सोमवारी मृत्यू - पाच 
एकूण मृत्यू - १८८ 
आज सोमवारी रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - ११३ 
आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - तीन हजार ३२८ 
सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - एक हजार ५९८ 
सध्या रुग्णालयात गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - १४३ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded 118 Positive On Monday 113 Corona Free In A Day Patient Deaths Nanded News