नांदेड : रस्ता, पुलाच्या बांधकामासाठी सव्वा तीन कोटी रुपये मंजूर

आमदार भीमराव केराम यांचे प्रयत्न; १५ वर्षांपासूनची मागणी पूर्ण
Nanded 15 crore sanctioned for construction of roads and bridges
Nanded 15 crore sanctioned for construction of roads and bridgessakal

किनवट : किनवट - माहूर विधानसभा क्षेत्र हे दुर्गम व आदिवासी बहूल असल्याने या क्षेत्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मागील अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या कामांना गती देण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी शासनाकडून मोठा निधी नुकताच उपलब्ध करून घेतल्याने मागील १५ वर्षापासून मागणी पूर्ण झाली आहे. कोठारी - शनिवार पेठ (ता. किनवट) या रस्त्याचे मजबूतीकरण व नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी तीन कोटी २४ लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. लवकरच या कामाचे भूमीपुजन होणार असल्याची माहिती भाजपा नेते अनिल तिरमनवार यांनी दिली.

आमदार केराम यांनी किनवट व माहूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी आणल्याचे श्री. तिरमनवार यांनी सांगितले. घोगरवाडी, कोसाई, आदिलाबाद या मार्गावरील तेलंगणा राज्याला जोडणारा पाच किलोमीटरच्या घाटाचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. या मार्गाचे लोकार्पण लवकरच केले जाणार आहे.

अतिदुर्गम भागातील पिंपळशेंडा रस्त्याचे काम अनेक वर्षापासून प्रलंबीत होते. येथील नागरीकांनी या रस्त्यासाठी विविध आंदोलने केली. आता या रस्त्यासाठी साडेचार कोटी रूपये निधी प्राप्त झाला आहे. कामालाही प्रारंभ झाला आहे. किनवट, माहूर, उनकेश्वर् येथील पैनगंगा नदीवरून उच्च् पातळीचे बंधाऱ्याचे काम मागील काही वर्षापासून काम रखडले होते. आमदार केराम यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या बंधाऱ्याची प्रशासकीय मान्यता मिळायची असून लवकरच या कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत. सारखणी, मिनकी, वडोली पाझर तलावालाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

आमदार स्थानिक निधीतून तालुक्यातील काही गावात सभामंडप व विविध समाज उपयोगी कामासाठी पाच कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री सडक योजनेतंर्गत किनवट व माहूर तालुक्यात ५० कोटी रूपये खर्च करून रस्ते विकासाच्या कामास मंजूरी मिळाली आहे. किनवट व माहूर तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या निवास बांधकाम व कार्यालयासाठी २५ कोटी प्राप्त झाले आहेत. माहूर येथे महसूल कर्मचाऱ्यासाठी १५ कोटी रूपयाची निवास बांधकाम तसेच तलाठी कार्यालयासाठी सात कोटी असा निधी प्राप्त झाला असून श्रीक्षेत्र माहूर जवळील पैनगंगा नदीवर भाविकांना स्नानासाठी घाटही बांधण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. सर्व कामे दर्जेदार पध्दतीने होण्यासाठी आमदार केराम हे प्रयत्नशील असल्याचे श्री. तिरमनवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com