esakal | नांदेड - १५ मालवाहु एसटी बसने केली ८६ लाखांपेक्षा अधिकची कमाई 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

महामंडळाने जून महिण्यापासून एसटी बसचे मालवाहु बसमध्ये रुपांतर करत विविध विभागात मालवाहु बससेवा सुरु केली. नांदेड विभागात १५ बसेस सुरु केल्या. अवघ्या सहा महिण्यातच या १५ मालवाहु बससेच्या माध्यमातून महामंडळास ८६ लाख ११ हजार ६२२ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

नांदेड - १५ मालवाहु एसटी बसने केली ८६ लाखांपेक्षा अधिकची कमाई 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - लॉकडाउन काळात सर्वप्रकारच्या दळणवळण सुविधा बंद होत्या. परिणामी महामंडळाचे उत्पन्न शुन्य झाले. बस कायमची बंद होणार अशी स्थिती निर्माण झाली होती. महामंडळाने जून महिण्यापासून एसटी बसचे मालवाहु बसमध्ये रुपांतर करत विविध विभागात मालवाहु बससेवा सुरु केली. नांदेड विभागात १५ बसेस सुरु केल्या. अवघ्या सहा महिण्यातच या १५ मालवाहु बससेच्या माध्यमातून महामंडळास ८६ लाख ११ हजार ६२२ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.
 
एसटी महामंडळाच्या मालवाहु बसला नांदेड विभागातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी महामंडळाने मालवाहु बसची संख्या वाढविण्याचा निर्धार केला आहे. मात्र, काही दिवसांपासून एसटीने पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरु केली आहे. त्यामुळे नांदेड विभागात चालक - वाहकांची कमतरता जाणवत आहे. मनात असताना देखील मालवाहु बसची संख्या वाढवता येत नसल्याची माहिती वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

हेही वाचा- नांदेड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी माहूर पोलिस ठाण्यातून पसार ​

शंभर ते दोनशे किलोमीटरच्या आत माल वाहतूक बससेवा 

बसचालकांची कमतरता असल्याने एकट्या चाककाच्या जिवावर शंभर ते दोनशे किलोमीटरच्या आत माल वाहतूक बससेवा दिली जात आहे. दोनशेपेक्षा जास्त किलोमीटरच्या मालवाहु बससोबत दोन चालक पाठवावे लागतात. जून ते नोव्हेंबर या सहा महिण्याच्या कालावधीत १५ मालवाहु बस नांदेडसह देगलूर, लातूर, बिलोली, धर्माबाद, गंगाखेड अशा तालुका आणि जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ३८३ किलोमीटर इतक्या धावल्या आहेत.

एकूण मालवाहु बस -

१५ 

एकूण प्रवास -

दोन लाख १४ हजार ३८३ किलोमीटर 

दिवसाचे सरासरी उत्पन्न -

४५ ते ५० हजार 

येथे नेला माल -

नांदेडसह देगलूर, लातूर, बिलोली, धर्माबाद, गंगाखेडसह इतर जिल्ह्यात प्रवास.  

हेही वाचले पाहिजे - नांदेड : किनवट सराफांची अशीही बनवाबनवी, २२ कॅरेटच्या नावाखाली ग्राहकांची लूट

भविष्यात प्रवशांसोबतच मालवाहतुकीसाठी विचार करावा लागणार 

 त्यातून दिवसाला सरासरी किमान ४५ ते ५० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे लहान मोठे उद्योजक, व्यवसायिक, कारखानदार यांचा एसटी महामंडळाच्या मालवाहु बसवर अधिक विश्‍वास वाढत असल्याने भविष्यात एसटी महामंडळास प्रवाशी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीसाठी देखील वेगळा विचार करावा लागणार आहे.


मालवाहु बसने लोकांविश्‍वास संपादन केला 
नांदेड विभागातुन मालवाहु बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या १५ मालवाहु बसेस तयार करण्यात आल्या असल्या तरी भविष्यात मालवाहु बसेसची संख्या वाढविण्याचा विभाग विचार करत आहे. प्रवासी एसटीने ज्याप्रमाणे प्रवाशांचा विश्‍वास संपादन केला आहे त्याचप्रमाणे मालवाहु बससेवा देखील अल्पावधीतच लोकांच्या विश्‍वास संपादनास पात्र ठरली आहे. 


- एस.के.निकाळजे, वाहतूक निरीक्षक, नांदेड विभाग. 
 

 
 

loading image