esakal | नांदेड : 18 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, तर 32 कोरोना बाधितांची भर      
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आजच्या एकुण 419 अहवालापैकी  386 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 694 एवढी झाली असून यातील  18  हजार 719 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 243 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

नांदेड : 18 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, तर 32 कोरोना बाधितांची भर      

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड  : मंगळवार (ता. १७) नोव्हेंबर रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 18 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 32 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 19 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले.

आजच्या एकुण 419 अहवालापैकी  386 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 694 एवढी झाली असून यातील  18  हजार 719 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 243 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज रोजी प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. तर आज बरे झालेल्या बाधितांमध्ये खाजगी रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 6, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3 असे एकूण 18 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 16, देगलूर तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 1 असे एकुण 19 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 13  बाधित आढळले.

हेही वाचा - आजही भाऊबीजेच्या दिवशी गायीच्या शेणापासून पाच पांडव-गायवाडा साकारण्याची परंपरा आहे सुरु -

जिल्ह्यात 242 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 28, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 14, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 71, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 10, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 12, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 3, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 14, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, खाजगी रुग्णालय 24, औरंगाबाद येथे संदर्भित 2, अकोला येथे संदर्भित 1, लातूर  येथे संदर्भित 4, हैदराबाद येथे संदर्भित 1 आहेत. 

मंगळवार 17 नोव्हेंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 168, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 82 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 29 हजार 70

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 5 हजार 840

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 694

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 719

एकूण मृत्यू संख्या- 541

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-406

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-243

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 18.

येथे क्लिक करानांदेड येथील 16 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सोडले घरी; 22 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू -

फटाक्यांच्या धुरामुळे कोविड बाधित  रुग्णांना व श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना त्रास अधिक वाढवू शकतो. त्यामुळे ही दिवाळी फटाके विरहित दिवाळी म्हणून साजरी करावी. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

loading image
go to top