नांदेड :दिवसभरात १८२ पॉझिटिव्ह ; ८२ जणांची प्रकृती चिंताजनक 

शिवचरण वावळे
Friday, 7 August 2020

मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी देखील १८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे बाधीत रुग्णांची संख्या तीन हजार ४२ इतकी झाली आहे. दरम्यान १०८ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून आत्तापर्यंत एक हजार ३२३ रुग्ण घरी सोडण्यात आले

नांदेड : कोरोना बाधितांचा आकडा शुक्रवारी (ता. सात) तीन हजार पार झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात १८२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर ८२ जणांची प्रकृती चिंताजनक असून दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात १०८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

शुक्रवारी (ता. सात) एक हजार ४५९ अहवाल प्राप्त झाले. यात एक हजार २३४ निगेटिव्ह व १८२ स्वॅब पॉझिटिव्ह आले. तसेच पाच रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी देखील १८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे बाधीत रुग्णांची संख्या तीन हजार ४२ इतकी झाली आहे. दरम्यान १०८ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून आत्तापर्यंत एक हजार ३२३ रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. 

हेही वाचा- गणेशमूर्ती कारागिरांमध्ये अस्वस्थता वाढली...काय आहे कारण? वाचा... ​

गुरुवारी पाच जणांचा मृत्यू

गुरुवारी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या नांदेडच्या भावसार चौक येथील पुरुष (वय ६०), तामसातील पुरुष (वय ७०) असे दोन व काजी मोहल्ला कंधार येथील महिला (वय ४०) तर मुखेड येथील मोमीन गल्लीतील पुरुष (वय ८६) आणि गोकुंदा येथील एसव्हीएम कॉलनी येथील महिला (वय ५२) या पाच बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने मृत्यूचा आकडा ११४ इतका झाला आहे. 

हेही वाचा- नांदेडात पुन्हा दोन पिस्तुलधारी युवकांना अटक - पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे ​

१८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी करण्याच्या हेतूने नांदेड महापालिकेच्या आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग या शिवाय जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मदतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधुन त्यांची आरटीपीसीआर व अँन्टीजेन असा दोन्ही पद्धतीने स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. त्यामुळे प्रयोगशाळेकडून तपासलेल्या स्वॅबचा अहवाल अगदी काही तासात प्राप्त होत आहे. शुक्रवारी आरटीपीसीआरद्वारे ८० व अँन्टीजेन तपासणीतून १०२ असे एकुण १८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

सध्या उपचार सुरु असलेल्या बाधित रुग्णांपैकी ८२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी घेण्यात आलेल्या स्वँबचपैकी शंभर स्वॅब अहवाल येणे बाकी आहेत. शनिवारी (ता. आठ) सायंकाळपर्यंत हा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता डॉ. भोसीकर यांनी सांगितले. 

तालुकानिहाय सोमवारी सापडलेले रुग्ण 

नांदेड महापालिका - ५७ 
अर्धापूर - दहा 
बिलोली- दोन 
धर्माबाद - तीन 
कंधार- नऊ 
माहूर- तीन 
नायगाव- २२ 
लोहा- दहा 
हिंगोली- पाच 
बारड- तीन 
भोकर- दोन 
देगलुर- नऊ 
हदगाव- आठ 
नांदेड ग्रामीण - दहा 
किनवट - सहा 
मुखेड- १६ 
उमरी- एक 
परभणी - एक 
मुदखेड - पाच 
एकूण - १८२ 

कोरोना मीटर 

एकुण सर्वेक्षण - एक लाख ४९ हजार ७५३ 
एकुण घेतलेले स्वॅब - दोन हजार ७६ 
एकुण निगेटिव्ह स्वँब - १५ हजार ५५४ 
एकुण पॉझिटिव्ह रुग्ण - तीन हजार ४२ 
आज शुक्रवारी पॉझिटिव्ह - १८२ 
एकुण मृत्यू - ११४ 
आज शुक्रवारी मृत्यू - पाच 
एकुण सुटी देण्यात आलेले रुग्ण - एक हजार ३२३ 
आज शुक्रवारी सुटी दिलेले रुग्ण - १०८ 
सध्या रुग्णालयात उपचार घेतलेले रुग्ण - एक हजार ५९० 
गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - ८५ 
आज प्रलंबित स्वँब - शंभर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: 182 Positives In A Day The Condition Of 82 People Is Critical Nanded News