नांदेड - शनिवारी २५५ रुग्ण कोरोनामुक्त ,२२२ पॉझिटिव्ह , पाच रुग्णांचा मृत्यू  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शनिवारी (ता.२६) एक हजार १९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये २२२ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ८९० वर पोहचली आहे.

नांदेड - शनिवारी २५५ रुग्ण कोरोनामुक्त ,२२२ पॉझिटिव्ह , पाच रुग्णांचा मृत्यू 

नांदेड - मागील दोन दिवसांपासून कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्याने जिल्ह्याचील पॉझिटिव्ह संख्येत घट झाली आहे. शनिवारी (ता.२६) प्राप्त झालेल्या एक हजार १९ जणांच्या अहवालात ७५२ निगेटिव्ह, २२२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, दिवसभरात २५५ रुग्ण कोरोना मुक्त झाले तर, पाच कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

शुक्रवारी (ता.२५) घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणीमध्ये शनिवारी (ता.२६) एक हजार १९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये २२२ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ८९० वर पोहचली आहे. तर दिवसभरात तरोडा नाका नांदेड पुरुष (वय- ६३), हडको नांदेड पुरुष (वय- ७०), विष्णुपुरी नांदेड महिला (वय- ५८), उमरी पुरुष (वय- ७०) व धनेगाव नांदेड पुरुष (वय- ५४) या चार पुरुषांचा व एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शनिवारपर्यंत जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ३८६ इतका झाला आहे. 

हेही वाचा- नांदेड - आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा अर्धजल समाधी आंदोलनाचा इशारा​

एक हजार ५६१ आहवाल येणे बाकी 

दहा दिवसाच्या उपचारानंतर शनिवारी २५५ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत दहा हजार ९५२ रुग्ण कोरोना मुक्त झाले. नांदेड महापालीका क्षेत्र-११५, नांदेड ग्रामीण- चार, देगलूर- सहा, अर्धापूर -दोन, बिलोली- सात, हदगाव-सात, धर्माबाद-११, किनवट- पाच, माहूर-एक, मुखेड-३६, मुदखेड-सात, लोहा-पाच, नायगाव-तीन, कंधार-तीन, उमरी-दोन, परभणी-चार, लातूर- दोन, यवतमाळ- एक, हिंगोली- एक असे २२२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या तीन हजार ४८१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. एक हजार ५६१ आहवाल येणे बाकी आहे. 

हेही वाचा- नांदेड : पत्नीच्या खूनानंतर विष पिलेल्या पतिचाही मृत्यू

या ठिकाणी सुरु आहेत उपचार

विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात- २६७, जिल्हा रुग्णालय- ८९, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत-४०, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय- २८, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईन- एक हजार ८१५, नायगवा- ९७, बिलोली- ३१, मुखेड- १४३, देगलूर- ७७, लोहा-४३, हादगाव- ३१, भोकर-४१, कंधार २५, बारड-१२, अर्धापूर-११३, मुदखेड-४७ माहूर-१६, किनवट- ९९, धर्माबाद-५९, उमरी-६१, हिमायतनगर- २५, खासगी रुग्णालय- ३१४, औरंगाबाद- दोन, निजामाबाद- एक, लातूर- दोन, अकोला-एक व आदिलाबाद येथे एक रुग्ण संदर्भीत करण्यात आला आहे. 

कोरोना मीटर

आज पॉझिटिव्ह रुग्ण- २२२
आज निगेटिव्ह- २५५
आज मृत्यू- पाच
आतापर्यंत पॉझिटिव्ह- १४ हजार ८९०
आतापर्यंत कोरोनामुक्त- १० हजार ५९२
आतापर्यंत मृत्यू- ३८६
उपचार सुरु-तीन हजार ४८१
रंभीर रुग्ण- ४४
आहवाल प्रतिक्षा- एक हजार ५६१
 

Web Title: Nanded 255 Patients Were Released Saturday 222 Positive Death 5 Patients Nanded News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top