नांदेड : 34  बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, 29 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू   

प्रल्हाद कांबळे
Sunday, 15 November 2020

आजच्या एकुण 1 हजार 233 अहवालापैकी  1 हजार 183 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 624 एवढी झाली असून यातील  18  हजार 660 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 249 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

नांदेड :- शनिवार 14 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 25 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 233 अहवालापैकी  1 हजार 183 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 624 एवढी झाली असून यातील  18  हजार 660 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 249 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज रोजी प्राप्त अहवालानुसार एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  शनिवार 14 नोव्हेंबर 2020 रोजी मुखेड तालुक्यातील येवती येथील 23 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 539 झाली आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, खाजगी रुग्णालय 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 14, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2 असे एकूण 34 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 4 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 15, देगलूर तालुक्यात 2, किनवट 1, उमरी 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव 2, नायगाव 1, मुखेड 1 एकुण 25 बाधित आढळले.

जिल्ह्यात 249 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 14, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 86, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 12, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 1, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 14, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 23, औरंगाबाद येथे संदर्भित 2, अकोला येथे संदर्भित 1, हैदराबाद येथे संदर्भित 1 आहेत. 

शनिवार 14 नोव्हेंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 165, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 81 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 27 हजार 264

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 4 हजार 167

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 624

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 660

एकूण मृत्यू संख्या- 539

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 21

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 356

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 249

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 15.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: 34 victims discharged after medical treatment, 29 corona sufferers killed nanded news