esakal | नांदेड : निसर्गाचा चमत्कार; कडू लिंबाच्या झाडावर पिंपळ, वडाचे झाड

बोलून बातमी शोधा

शिवणी झाड

नांदेड : निसर्गाचा चमत्कार; कडू लिंबाच्या झाडावर पिंपळ, वडाचे झाड

sakal_logo
By
विठ्ठल लिंगपुजे

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील शिवणी येथे एका रिकाम्या जागेवर रस्त्याच्या कडेला एक कडूलिंबाचे झाड असून त्या झाडाचे वय अंदाजे चाळीस वर्षे असेल व वैद्यकीय शास्त्रात लिंबाच्या झाडाला खूप महत्त्वही आहे.

हेही वाचा - चांगली बातमी : नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्न बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के; मृत्यूचेही प्रमाण घटले

रस्त्याच्या कडेला असलेल्या कडू लिंबाच्या झाडावर निसर्गान तयार केलेले पिंपळ वडाचे झाड आहे. असे एका झाडावर तिन प्रकारची झाडे आहेत. या झाडापासून मनुष्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत असते. वड, पिंपळ ज्या भागात मोठ्या प्रमाणात असतात त्या भागात पावसाचे प्रमाणही जास्त प्रमाणात राहते असे जाणकार सांगतात. या झाडाखाली थंड हवाही राहते. त्यामुळे या झाडावर मोठ्या प्रमाणात पक्षाचा वावरही राहतो. तसेच या झाडावर पक्षी आपली घरटी बांधतात अशा अनेक झाडामुळे जमिनीवरती धुप कमी करण्यास मदत करीत असतात त्यामुळे निसर्गाचा हा चमत्कारच आहे असे म्हटले जाते.

संपादन- प्रल्हाद कांबळे