

Nanded Student Protest
esakal
नांदेड: राज्यातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध शैक्षणिक समस्यांकडे शासनाने तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड शाखेच्या वतीने गुरुवारी (ता.१२) पंचवटी हनुमान मंदिर मल्टीपर्पज मैदान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात विविध आयटीआय, वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्थांमधील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या.