नांदेड : मंगळवारी 56 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 27 January 2021

आरटीपीसीआर तपासणीद्वारे 48 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 8 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 42 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

नांदेड  : मंगळवार 26 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 56 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 48 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 8 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 42 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 2 हजार 654 अहवालापैकी 2 हजार 590 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 330 एवढी झाली असून यातील 21 हजार 226 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 318 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. मंगळवार 26 जानेवारी रोजी दत्तनगर नांदेड येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 583 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, मुखेड कोविड रुग्णालय 8, हदगाव कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, मुदखेड तालुक्यांतर्गत 4, माहूर तालुक्यांतर्गत 2, खाजगी रुग्णालय 4  असे एकूण 42 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 36, भोकर तालुक्यात 1, उमरी 1, हदगाव 4, नांदेड ग्रामीण 3, मुखेड 2, कंधार 1 असे एकुण 48 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 1, मुखेड तालुक्यात 7 असे एकुण 8 बाधित आढळले.

जिल्ह्यात 318 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 10, मुखेड कोविड रुग्णालय 12, महसूल कोविड केअर सेंटर 9, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 204, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 36, खाजगी रुग्णालय 11 आहेत. मंगळवार 26 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 167, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 92 एवढी आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 5 हजार 452
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 78 हजार 849
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 330
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 226
एकुण मृत्यू संख्या-583
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-318
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-9.          


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: In addition to 56 corona victims, one died nanded news