ब्लॅक फंगसला रोखण्यासाठी नांदेड प्रशासनाची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

black fungus

ब्लॅक फंगसला रोखण्यासाठी नांदेड प्रशासनाची तयारी

नांदेड : कोरोनाचा तडाख्यातून बचावलेल्या (Corona virus) अनेक रुग्णांना म्यूकरमायक्रोसिस अर्थात ब्लॅक फंगस (काळी बुरसी) या (Black fungus)आजाराने ग्रासले असून जिल्ह्यात अशा रुग्णांची संख्या जवळपास 100 वर पोहोचली आहे. त्यापैकी अति गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या 16 रुग्णांचा मृत्यू या आजारामुळे झाला आहे. या आजाराला परतवून लावण्याची जोरदार तयारी जिल्हा व आरोग्य विभागाने केली असून त्यांच्या या प्रयत्नाला यश येत असल्याचे पहावयास मिळत आहे. (Nanded- administration- prepares- to- black- fungus)

ब्लॅक फंगसमुळे आतापर्यंत 50 रुग्ण या महाभयंकर आजारातून बरे झाले आहे. दरम्यान म्यूकरमायक्रोसिसचे काही रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. गेल्या वर्षभरापासून लढा देणारे प्रशासन तसेच या आजारातून बाहेर पडलेल्या समोर या नावाचे नवे संकट उभे राहिले आहे. पूर्ण संसर्गातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना डोळे, नाक, कान तसेच मेंदूपर्यंत संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले असून या आजारामुळे रुग्णांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा - नाकाबंदी ठिकाणांवर उद्धट वर्तन व अरेरावीच्या भाषेबरोबरच काठी उगारण्यापर्यंत मजल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असे रुग्ण मोठ्या प्रमाणात समोर आल्यानंतर या आजाराचे स्वरुप पाहून प्रशासन व आरोग्य यंत्रणाही चिंतेत पडली आहे. लवकर या आजाराने नांदेड जिल्ह्यात पाय पसरले असून आतापर्यंत 92 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी अतिगंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण उपचारादरम्यान दगावल्याची सांगण्यात आले. हा आजार किती गंभीर आहे हे लक्षात घेऊन प्रशासन व आरोग्य यंत्रणेने मोठी पूर्वतयारी केली आहे. त्यासाठी योग्य ते उपचार पद्धती निश्चित करण्यात आली. यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळाल्याने त्यांच्या शरीरातून हा आजार निघून गेला. बरे झालेल्या या अशा रुग्णांची संख्या जवळपास पन्नास झाली आहे.

दरम्यान अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. वरील उपचाराच्या वेळेस रुग्णांची जीव वाचवण्यासाठी प्रसंगी त्यांचे काही अवयव शस्त्रक्रिया करुन काढावे लागते, अत्यंत वेदनादायी असते, पण त्याला दुसरा पर्याय नाही. दुसरीकडे आजारावरील उपचारही खूप महाग असून लाखो खर्च होतो.

loading image
go to top