नांदेड : खतासोबत लिंकिंग केल्यास कठोर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded fertilizer distribution companies

नांदेड : खतासोबत लिंकिंग केल्यास कठोर कारवाई

नांदेड : रासायनिक खत घेणाऱ्या शेतकऱ्यांना खत विक्रेत्याकडून इतर कोणत्याही निविष्ठा घेण्याचे अनिवार्य करु नये, असा प्रकार नांदेड शहरासह जिल्ह्यात आढळून आल्यास संबधीत कंपनी व कृषी निविष्ठा विक्रेत्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिले आहेत.

खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नवा मोंढा येथील नांदेड जिल्हा सिड्‌स, फर्टीलायझर अन्ड पेस्टीसाईड डिलर्स असोशियशनच्या कार्यालयात खत विक्रेते, कंपनी प्रतिनिधी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमनशेट्टे, मोहिम अधिकारी श्री. हुंडेकर, तालुका कृषी अधिकारी सिध्देश्‍वर मोकळे, विक्रेते विपीन कासलीवाल, दिवाकर वैद्य, ईश्‍वर अग्रवाल, दिनेश अग्रवाल, शिवा पुरमवार, सदाशिव पुंड, आनंद मुथा, मनोज सारडा, गणेश मामीडवार, धनराज मंत्री, पवन लखोटीया यांच्यासह खत कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून खत वितरकांकडून रासायनीक खतासोबत शेतकर्‍यांना इतर निविष्ठा घेण्याचे अनिवार्य केल्याने ऐेन हंगामात खत विक्रेते आणि शेतकऱ्यात वाद होत आहेत. याबाबत आलेल्या तक्रारीच्या अनुषगांने बेठक घेतली. यावेळी रविशंकर चलवदे यांनी खत उत्पादक कंपन्यांना कोणत्याही खतासोबत वितरकांना लिंकींग देवू नये, तसेच वितरकांनीही किरकोळ विक्रेते व शेतकर्‍यांना खतासोबत इतर निविष्ठा देण्याचा घाट घालू नये, अन्यथा संबधिताविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. या सोबतच जिल्ह्यातील खते इतर जिल्ह्यातील विक्रेत्यांना विक्री करु नये, डीएपी खत अधीकच्या दराने विक्री करु नये, असे निर्देश दिले.

काही बियाणे अधिकच्या दराने विक्री

जिल्ह्यात काही बियाणे मुख्य वितरक अधिकच्या दराने विक्री करीत आहेत. यात कपाशीचा कबड्डी वाण, सोयाबीनचे विक्रांत व ३३४४ हे बियाणेही अधिकच्या दराने विक्री होत असल्याने किरकोळ विक्रेत्यांसह शेतकऱ्यांना अधिकचा भुर्दंड पडत आहे. याबाबतही कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Nanded Agriculture Department Warning Strict Action About Fertilizer Distribution Companies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top