
नांदेड : जिल्ह्यात विक्रीपूर्व तपासणी, विक्री परवाना नसताना साठवून ठेवलेला १९ लाखांचा कीटकनाशकांचा साठा कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला. राजकोट (गुजरात) येथील अवलॉन क्रॉपसायन्स प्रा.लि. आणि छत्रपती संभाजीनगर येथील श्रीनय अॅग्रो बायोटेक या दोन कंपन्यांविरोधात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.