Nanded Airport : नांदेड विमानतळाची सुरक्षा धोक्यात; संरक्षक भिंतीला भगदाड

नांदेड शहरातील विमानतळाच्या संरक्षक भिंतीला अनेक ठिकणी भगदाड पडल्याने सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.
Nanded Airport protective wall Break
Nanded Airport protective wall Breaksakal

नांदेड - शहरातील विमानतळाच्या संरक्षक भिंतीला अनेक ठिकणी भगदाड पडल्याने सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. मात्र याबाबत स्थानिक सुरक्षा यंत्रणा कमालीची गाफील असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नांदेड विमानतळाच्या सुरक्षेसासाठी आठ ते दहा फुटांची संरक्षक भिंत आहे. तेथून धावपट्टी पंधरा ते वीस फुटांवर आहे. परंतु या संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणी भगदाड पडल्यामुळे बाहेरील लोकांना धावपट्टी स्पष्टपणे दिसते. यामुळे विमानतळाची सुरक्षा धोक्यात आली आहे. विमानतळाची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांना या विषयाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

या विमानतळावरून पुणे, बंगळूर, हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद या प्रमुख शहरांसाठी नुकतीच विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे रोज सहा फेऱ्यांद्वारे ४०० ते ५०० प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे विमानतळ दिवसभर गजबजलेले असते. विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ५४ पोलिस कर्मचारी तैनात आहेत; परंतु संरक्षक भिंतीला भगदाड पडल्यामुळे विमानतळाच्या संपत्तीला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, विमानतळाजवळील भागात अनधिकृत बांधकामे आणि स्टॉल्स उभे राहिले आहेत. महापालिका, पोलिस विभाग आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मासिक बैठकीत या प्रश्नावर उपाययोजना सुचविल्या जातात. अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे चित्र आहे.

गांभीर्य ओळखून त्रुटी दूर व्हाव्यात

शहरात गेल्या काही काळापासून वाढलेली गुन्हेगारी, खून, दरोडे, अधूनमधून घडणाऱ्या गोळीबारासारख्या घटना, विविध कारणांसाठी धमक्या आदींच्या पार्श्वभमीवर त्या-त्या वेळी शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पहायला मिळाले होते. या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या सुरक्षेसारख्या संवेदशील विषयातील त्रुटी दूर करण्यासाठी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यासाठी स्थानिक सुरक्षा यंत्रणा, विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com