Nanded News: अक्षय्य तृतीयेला खरेदीचा उत्साह; आंबा, माठांसह सराफा, वाहन बाजाराला झळाळी

Nanded Market Buzz Ahead of Akshaya Tritiya: नांदेडमध्ये अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीचा उत्साह वाढला. आंबा, माठ, सोने, चांदी, घर व वाहन खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल दिसून आली.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: शहरातील बाजारपेठांमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला शनिवारी नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. विविध बाजारपेठांत आंबे व माठ खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ दिसून आली.

पारंपरिक श्रद्धेनुसार या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व असल्याने व रविवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीचा शिखर दिवस ठरण्याची शक्यता असून, सराफा बाजारात सोन्याचांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com