नांदेड : प्रधानमंत्री ग्राम सडक अंतर्गत २०६ किलोमीटरच्या कामांना मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे मतदार संघातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. 

नांदेड : प्रधानमंत्री ग्राम सडक अंतर्गत २०६ किलोमीटरच्या कामांना मंजुरी

नांदेड : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणाऱ्या २०६ किलोमीटर रस्त्याच्या कामांना केंद्र आणि राज्य शासनाने मंजुरी दिली असून खासदार हेमंत पाटील याबाबत केंद्र स्तरावर पाठपुरावा करून कामांना मंजुरी मिळविली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे मतदार संघातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. 

मतदार संघात ग्रामीण भागातील तालुका आणि जिल्हास्तरापर्यंत जोडण्यात येणारे प्रमुख रस्ते मागील बऱ्याच वर्षांपासून खिळखिळे झाल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना दळणवळणासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावर थातुर मातुर डागडुजी करून येऊन पुन्हा हे रस्ते खराब होत असत.  खासदार हेमंत पाटील यांनी संपूर्ण मतदार संघाचा दौरा केल्यांनतर रस्त्याची दयनीय अवस्था त्यांच्या लक्षात आली तसेच काही भागात अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले होते यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खासदार हेमंत पाटील यांनी केंद्र आणि राज्य स्तरावर पत्रव्यवहार केला आणि  प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कामांना मंजुरीकरिता विशेष प्रयत्न केल्यामुळेच संपूर्ण मतदार संघातील हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात एकूण २०६ किलोमीटरच्या कामांना मंजुरी मिळाली आहे लवकरच या कामाला सुरवात होऊन नागरिकांना पक्के आणि मजबूत रस्त्यावरून प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा - केवळ बदनामीसाठी केलेला खटाटोप आहे; मी उद्या सविस्तर बोलेल- बलात्काराच्या आरोपानंतर राजेश विटेकरांची प्रतिक्रिया

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सांडस सालेगाव रुपूर, वाई- वाकोडी, हिंगोलीमधील इडोळी- आमला- काळकोंडी , कोथळज- समगा, पारोळा- नवलगव्हाण, कानखेडा- वांझोळा तर औंढा तालुक्यातील रांजाळा- सिरला- उमरा, जवळा- अजलसोंडा, चिंचोली- निळोबा ते पेरजाबाद तर वसमत मधील गिरगाव- रेडगाव, भोरीपगाव- राजापूर, किन्होळा- कुरुंदा, उमरी- गिरगाव- देळूब या रस्त्यांचा तसेच नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर- कोल्हारी, इस्लापूर- पांगरी- भिसी, मांडावी- लिंगीतांडा, किनकी- मिनकी- तलाईगुडा यागावांच्या रस्त्याचा समावेश आहे.
 
हदगाव तालुक्यातील येळंब ते राज्यमार्ग जोडरस्ता, वायपणा- घोगरी- चिखला- दिग्रस, चोरंबा (बु)- केदारगुडा, तर माहूर मधील अंजनखेडा- नाईकवाडी- सावरखेडा आणि हिमायतनगर तालुक्यातील एकंबा- सिलोडा- श्रीपल्ली- डोलारी- पळसपूर- हिमायतनगर- पार्डी (ज )- एकदरी- वसई ते तेलंगणा सीमेपर्यंतच्या रस्त्यांचा समावेश आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाणकी- सावळेश्वर, ढाणकी- गाजेगाव- सिंदगी- ब्राम्हणगाव- चातारी कोपरा तसेच महागाव तालुक्यातील महागाव- उटी- कोठारी या रस्त्याचा समावेश असून लवकरच कामाला सुरवात होणार आहे. रस्त्याच्या कामाला मिळालेल्या मंजुरीमुळे याभागातील नागरिकांमधून खासदार हेमंत पाटील यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Web Title: Nanded Approval 206 Km Works Under Pradhan Mantri Gram Sadak

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..