नांदेड : अर्धापुरात पाऊस झाला नॉटरिचेबल

शेतकऱ्यांची वाढली घालमेल : पेरण्या खोळंबल्या
Nanded farmer sowing pending
Nanded farmer sowing pending

अर्धापूर : राज्यातील आमदार नॉटरिचेबल झाल्याने सत्ताधाऱ्यांची घालमेल वाढली होती. तसीच सध्या शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. पाऊस गेल्या महिन्यापासून नॉटरिचेबल झाल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या असून ज्या शेतकऱ्यांनी धाडस करून पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तालुक्यात केवळ ५८ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहेत. पाऊस लहरी झाला असून कधी तो संपर्कात राहतो तर कधी नाही. आत्तापर्यंत सुमारे ९० मिमी पाऊस झाला आहे.

यंदाच्या हंगामात पाऊस चांगला होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविली होता. या आंदाजामुळे शेतकरी सुखावला होता. पण आख्खा जुन महिना कोरडा गेला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून पेरणीची तयारी केली आहे. बि-बीयाने खते खरेदी केले आहेत. पण तो रुसलेला आहे. तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्र सूमारे २६ हजार हेक्टरच्यावर आहे. सोयाबीन, कापूस, हळद, केळी, तूर, मूग, ज्वारी, उडीद आदी पिके घेण्यात येतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात कमीच झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. यंदा प्रथमच केळीला विक्रमी भाव मिळाला आहे. याचा परिणाम यंदा केळीच्या लागवडी क्षेत्रावर होणार आहे. यंदा केळीचे क्षेत्र वाढणार आहे. तर कमी उत्पन्न, भाव कमी असल्याने हळदीची लागवड कमी होण्याची शक्यता आहे.

खरिपाच्या पेरण्या करतांना बिजप्रक्रिया करून पेरणी करावी. विद्यापिठाने शिफारस केलेल्या कमी वेळात येणाऱ्या सोयाबीनच्या बियाण्याची पेरणी करावी. तसेच जमिनीत पेरणी योग्य ओलावा आसल्यावरच पेरणी करावी अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले यांनी दिली. गेल्या हंगामात खरिपाच्या पेरण्या लवकर झाल्या होत्या. सोयाबीनचे उत्पन्न जेमतेम झाले. मागचे सारे विसरून यंदाच्या खरिपाच्या हंगामाची तयारी केली आहे. पण पाऊस आमच्यावर जरा रुसलाच आहे. पेरण्या खोळंबल्या असून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहोत अशा भावना शेतकरी निलेश हिंगमिरे यांनी ‌‌‌‌‌‌‌‌‌व्यक्त केल्या.

तालुक्यात ५८ टक्के पेरण्या

निसर्गाच्या भरवशावर शेतकऱ्यांना पेरण्या केल्या असून तालुक्यातील पेरणी योग्य क्षेत्रापैकी सुमारे १६ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यात ज्वारी २२ हेक्टर, कापुस ४३२ हेक्टर, तुर ३४३ हेक्टर, मुग २०० हेक्टर, उडीद ११३ हेक्टर, सोयाबीन साडे नऊ हजार हेक्टर, हळद अडिच हजार हेक्टर, केळी ९०० हेक्टर, ऊस ९५२, भाजीपाला १३८ हेक्टर, इतर ७४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. घाईगडबडीत पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर दूबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com