esakal | नांदेड : धार्मिकस्थळे उघणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या लाॅकडाऊनमुळे गेल्या साडेसात महिन्यापासून राज्यातील सर्व धार्मिकस्थळे, मंदिरे बंद होती. त्यामुळे मंदिरावर उपजीविका असणाऱ्यांची उपासमार झाली. पूजेचे साहित्य. बेल- फुल विक्रेते, पुजारी तसेच धार्मिक स्थळांच्या परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजेस धार्मिक पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. 

नांदेड : धार्मिकस्थळे उघणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : दिवाळीच्या पाडव्यापासून म्हणजे सोमवार (ता. १६) नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे मंदिरे खुली होणार असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत शनिवारी (ता. १५) घोषणा केली होती. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या लाॅकडाऊनमुळे गेल्या साडेसात महिन्यापासून राज्यातील सर्व धार्मिकस्थळे, मंदिरे बंद होती. त्यामुळे मंदिरावर उपजीविका असणाऱ्यांची उपासमार झाली. पूजेचे साहित्य. बेल- फुल विक्रेते, पुजारी तसेच धार्मिक स्थळांच्या परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजेस धार्मिक पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. 

नांदेड येथे प्रसिद्ध गुरुद्वारा आहे. येथील सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी देश- विदेशातील यात्रेकरु दर्शनासाठी येतात. लाॅकडाऊनच्या काळात मात्र यात्रेकरुंना येथे येता आले नाही. याचा विमानसेवा व रेल्वेवर परिणाम झाला. दुसऱ्या बाजूला गुरुद्वाराचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले. कोट्यावधी रुपये देणगी स्वरुपात गोलकमध्ये जमा होतात. परंतु या काळात हे उत्पन्न काही लाखावर आले. त्यामुळे सेवेकरी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम पडला.  एकूणच गेल्या साडेसात महिन्यापासून मंदिरावर अवलंबून असणाऱ्या घटकांचे अतोनात हाल झाले.

आता धार्मिक स्थळे व मंदिरे येत्या सोमवारपासून उघडल्या जाणार असल्याने भाविक तसेच मंदिरांची निगडित व्यावसायीकामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान गेल्या महिन्याभरापासून विश्व हिंदू परिषद, भाजप तसेच आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून आणि साधू संतांकडून मंदिरे खुली करण्याची मागणी सातत्याने झाली. परंतु राज्य शासनाने याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय घेतला नव्हता. एका बाजूला दारुची दुकाने उघडण्यात आली होती. पण त्यावर विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले होते. अखेर सरकारला सर्वच धार्मीक स्थळे उघडण्याचा निर्णय घेणे भाग पडले.