Nanded News: ट्रॅव्हल्सच्या डिकीतून दहा लाखांचा ऐवज लांबविला
Nanded Theft: लातूरवरून नांदेडला येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या तरुणाची डिक्कीत ठेवलेली बॅग चोरीला गेली. सोनं, रोख रक्कम मिळून नऊ लाखांहून अधिक ऐवज गहाळ.
नांदेड : लातूरकडून नांदेडला येणाऱ्या जहागीरदार ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाची पैसे आणि दागिने असलेली बॅग ट्रॅव्हल्सच्या डिकीतून चोरीला गेल्याची घटना घडली.