Nanded: ...अन् दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला केला

जवळच काम करणाऱ्या इतरांनी घटना पाहून आरडाओरडा करत घटनास्थळाकडे धाव घेतल्याने अस्वलाने तेथून पळ काढला.
Nanded bear suddenly attacked forest animal
Nanded bear suddenly attacked forest animalSakal

माहूर - तालुक्यातील मेंडकी येथील शेतकरी सुभाष दुधराम चव्हाण हे शेतात कापुस पिकाला खत देण्याचे काम करीत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला केला. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.

Nanded bear suddenly attacked forest animal
Pune: रणरागिनी एकवटल्या, इंदापूरमधील वीस हजार महिलांची साखळी

शेतकरी चव्हाण हे शेतातील कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या अस्वलांने अचानक पाठीमागून हल्ला करुन शेतकऱ्यांस जमिनीवर पाडले नंतर तोडांचा जबडा फोडला. जवळच काम करणाऱ्या इतरांनी घटना पाहून आरडाओरडा करत घटनास्थळाकडे धाव घेतल्याने अस्वलाने तेथून पळ काढला.

Nanded bear suddenly attacked forest animal
Mumbai University Election : मुंबई विद्यापीठ निवडणुकीत ठाकरेंना बसू शकतो फटका; 'या' नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

गंभीर अवस्थेत असलेले शेतकरी सुभाष चव्हाण यांना लोकांनी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. या वेळी वनविभागाचे कर्मचारी यांनी तातडीची मदत म्हणून रोख स्वरूपात पाच हजार रूपयांची आर्थिक मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com