Nanded : नेत्याच्या यात्रेमुळे अखेर रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Nanded : नेत्याच्या यात्रेमुळे अखेर रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला

मारतळा : नांदेड - हैदराबाद महामार्गावरील मारतळा बस थांबा ते कापसी रोड हा रस्ता मागील अनेक दिवसापासून जड वाहनामुळे दबल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी सदर रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा निवेदन देऊनही रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागत नव्हता. मात्र अखेर नेत्याच्या यात्रेमुळे सदर रस्त्याचे कामाला मुहूर्त मिळाल्या चर्चा गावकऱ्यांत रंगली आहे.

मारतळा (ता.लोहा) हे नांदेड - हैदराबाद महा मार्गावरील आठवडे बाजार पेठेचे गाव असून २५ त ३० खेडे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे सतत लोकांची वर्दळ असते. मागील काही महिन्यापासून जड वाहनामुळे बस थांबा ते कापशी रोड पर्यंतचा रस्ता दबल्यामुळे दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यासाठी सदर रस्त्याचे लेवल करून रस्ता दुरुस्तीची अनेकदा मागणी झाली. त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडूनही सदर कंपनीस दुरुस्तीसाठी उपसरपंचानी भेटून मागणी केली होती.

तेव्हा जेसीबीने थातूर - मातूर खरडून लेवल केले आणि पुन्हा दुरुस्तीचे काम जैसे थेच होते. मात्र आता कॉँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा (ता.सात) देगलूर येथून नांदेड जिल्ह्यात येत असून यांच मार्गे (ता.नऊ) रोजी कौठा फाटा येथे मुक्काम व कापसी गुंफा येथून पद यात्रेला सुरुवात होणार

आहे. ती पुढे मारतळा येथून नांदेड कडे जाणार असल्याने अखेर गुरुवारी (ता. तीन) रोजी सदर बस थांबा ते कापशी रोड पर्यंतच्या कामाला मशीनद्वारे सुरुवात झाली. यामुळे गावाकऱ्यांमध्ये अखेर नेत्याच्या यात्रेमुळे का होईना? कामाला मुहूर्त लागल्याची चर्चा गाव कट्ट्यावर रंगली आहे.