Nanded : ‘भाऊराव’ ने शेतकऱ्यांचे हित साधले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Bhaurao Chavan Cooperative Sugar Factory

Nanded : ‘भाऊराव’ ने शेतकऱ्यांचे हित साधले

अर्धापूर : कै. शंकरराव चव्हाण यांनी जलक्रांती केली. इसापूर धरणामुळे नांदेड जिल्ह्यातील शेती ओलिताखाली आली व ऊसाचे क्षेत्र वाढले. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने स्थापणेपासून शेतकऱ्यांचे हित साधले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे.

निवडणूक बिनविरोध झाल्याने एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. ऊसाची लागवड नियोजनबध्द झाली तर कारखान्यावर तान पडणार नाही, असे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती बी.आर. कदम यांनी शनिवारी (ता.२२) केले. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा २७ गाळप हंगामास उत्साहात सुरुवात झाली या वेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील एक यशस्वी उद्योग समूह साधन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखानाचा गाळप हंगामास गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून सुरुवात केली. या वेळी ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार यांचा सत्कार करुन गव्हाणीची पुजा करुन एक छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके, उपाध्यक्ष प्रा.कैलास, डॉ. रावसाहेब शेंदारकर, मारोतराव गव्हाणे, बाळासाहेब देशमुख, दिलीपराव देशमुख, श्यामराव पाटील टेकाळे, कार्यकारी संचालक श्याम पाटील, व्यवस्थापकीय संचालक एस.डी. बोखारे, प्रताप देशमुख, आदी उपस्थित होते. या वेळी आजी-माजी संचालकांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकण्यात आली.

निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने गाळप हंगामाचा शुभारंभ साधेपनाने करण्यात आला. या वेळी संचालक, व्यंकटराव कल्याणकर, अॅड. सुभाषराव कल्याणकर, व्यंकटी साखरे, मोतीराम जगताप, लालजी कदम, बळवंत इंगोले, सुभाषराव देशमुख, आनंद सावते, दत्ता सुर्यवंशी, किशनराव पाटील, बालाजी शिंदे, माधवराव कल्याणे,

दत्तात्रय आवातीरीक, शिवाजीराव पवार, अशोक कदम, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, सोनाजी सरोदे, प्रवीण देशमुख, भिमराव कल्याने, ईश्वर इंगोले, माधव कदम, दत्ता देशमुख, अमोल डोंगरे, आनंद कपाटे, भगवान तिडके, संजय भोसले, लक्ष्मण जाधव, गजानन कदम, चंद्रमुणी लोणे, संजय लोणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी शिवाजीराव देशमुख यांनी केले.