नांदेड : भोकर तालुक्यातील खडकी गाव होणार पाणीदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Bhokar Khadki village water level rise

नांदेड : भोकर तालुक्यातील खडकी गाव होणार पाणीदार

भोकर : गाव तलावातील गाळ काढला आणि भुर्गातील पाणी पातळी वाढली. या छोट्याशा प्रयत्नाने ग्रामस्थांना चारहत्तीच बळ आलं. अधिकारी आणि सेवा समर्पण परिवारानी गाव पाणीदार करण्याचा विढा उचलला. गावाला गावपण मिळून देण्यासाठी ग्रामस्थांनी स्वंयसुस्फूर्तीनी सहभाग घेतला आहे. असंख्य हात श्रमदानासाठी सरसावले आहेत. त्रिवेणी संगमाने गाव पाणीदार होणार असल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंदा दिसून येत आहे. ईथे मोल ना दामाचे...मोती होतील घामाचे ! असा आशावाद मनी बाळगून विधायक कामाला झोकून दिले आहे.

भोकर - म्हैसा रस्त्यावरील मातुळ गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर तेलंगणा सिमेवर असलेले खडकी (ता. भोकर) गावची लोकसंख्या जेमतेम एक हजाराच्या आसपास असून कुटुंब संख्या (११०) तर मतदार संख्या (४७५) अशी आहे. येथील ग्रामस्थ जातपात विरहित राहून गुण्यागोविंदाने नांदतात त्यामुळे गावात कसलाच वादविवाद होत नाही. सगळेच सणोत्सव एकत्र मिळून साजरे करण्याची परंपरा आजही कायम आहे.

विकासाच्या बाबतीत मात्र फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही. शेती सिंचनाच्या विकासाची दारे खुली नसल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. भुगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जलसंधारणाची कामे होणे गरजेचे होते तसा प्रयत्नही कुणी केला नाही. मागच्या वर्षी येथील ग्रामस्थांनी गावालगत असलेल्या गाव तलावातील गाळ काढण्याचा एकमुखी निर्णय घेतला नव्हे तर स्वखर्चातुन ते काम तन, मन, धनाने केल्याने चमत्कार झाला आणि भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. सध्या विहिर अधिग्रहण करून तहान भागली जाते. या मुळे ग्रामस्थांना आत्मविश्वास निर्माण झाला व गावच्या भल्यासाठी काही तरी करण्याची ऊर्मी निर्माण झाली.

ते भेटले अन् स्वप्नपूर्ती झाली

येथील उपविभागीय महसूल अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी संबध तालूका पिंजुन काढला तेव्हा खडकी ग्रामस्थांनी ‘‘साहेब आम्हाला गावच्या भल्यासाठी काही तरी करण्याची इच्छा आहे असे सांगितले हाच धागा पकडून श्री. खंदारे यांनी शहरातील सेवा समर्पण परिवाराच्या सदस्यांना सोबत घेऊन खडकी येथे ग्रामस्थाची बैठक घेतली. जलसंधारणाची कामे करण्यासाठी महाश्रमदान करण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ग्रामस्थ, सेवा समर्पण, अधिकारी असा त्रिवेणी संगम झाल्याने मागील १६ एप्रिल रोजी उप विभागीय महसूल अधिकारी राजेंद्र खंदारे, सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड, वनश्रीचे निता माळी, सरपंच प्रतिनिधी नामदेव तरंगे, ग्रामसेवक एस.ए.गंगोत्री यांनी जलसंधारणाच्या कामाला प्रत्येक सुरूवात केली आहे. सलग पन्नास दिवस श्रमदानातून जलसंधारणाची कामे युध्दपातळीवर सुरू झाली असून (ता.पाच) जून रोजी महाश्रमदानाने या कामाचा समारोप करण्यात येणार आहे. ते भेटले आणि आमची स्वप्न पूर्ती झाली अशी माहिती ग्रामस्थांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली आहे.

Web Title: Nanded Bhokar Khadki Village Water Level Rise

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedBhokarwaterSakal
go to top