नांदेड: दुचाकीचा स्फोट होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरानजिकच्या खुदबेनगर ते वाजेगावकडे जाणाऱ्या बायपास मार्गावरील वाजेगाव बंधाऱ्याजवळ शनिवारी (ता. २१) सकाळी घडली. .मिळालेल्या माहितीनुसार, खुदबेनगरहून दुचाकीस्वार वाजेगावकडे जात होता. गोदावरी नदीवरील पुलाजवळ दुचाकीचा स्फोट झाला. या स्फोटात दुचाकी खाक झाली..Nanded News: नांदेडमध्ये ८२ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी; २८ एप्रिलला मतदान.या घटनेत चालक गंभीर जखमी झाला होता. स्थानिकांनी त्याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. .UP News: “झाडे आहेत तरच आयुष्य आहे!” योगी आदित्यनाथ यांचा ग्लोबल वॉर्मिंगवर इशारा; वनसंवर्धनावर भर....उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृताची ओळख उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. ग्रामणी पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. .तांत्रिक बिघाड की अन्य काही कारणाने दुचाकीचा स्फोट झाला, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला, असावा असा प्राथमिक अंदाज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी व्यक्त केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.