Nanded News: दहा टक्के रोख भरा, मगच लिलावात भाग घ्या; तेलंगणातील ठेकेदारांवर बंदी, आज होणार फेरलिलाव

Telangana Contractor Banned from Auctions: नांदेडमध्ये शासकीय वाळू लिलावासाठी तेलंगणातील ठेकेदारावर बंदी; दहा टक्के रोख भरण्याशिवाय लिलावात सहभागी होऊ शकणार नाही.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

बिलोली: शासकीय डेपोतील वाळूला बोली लावून रक्कम न भरणाऱ्या तेलंगणातील निर्मल येथील पोशट्टी दरमारम यास वर्षभरासाठी लिलावात भाग घेण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील कुठल्याही वाळू लिलावात त्यास भाग घेता येणार नाही.

तालुक्यातील सगरोळी येथील शासकीय डेपो क्रमांक एकमधील शासकीय वाळू डेपोतील चार हजार ब्रास वाळू लिलाव मंगळवारी (ता. २४) ठेवण्यात आला होता. शासकीय दरानुसार, प्रतिब्रास ७१७ रुपये किंमत आकारण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com