नांदेड : मालेगावात शेकापचा रास्ता रोको, कंत्राटदार, अभियंत्यावर गुन्हे दाखल करा 

अमोल जोगदंड
Thursday, 10 September 2020

222 महा मार्गाचे चौपदरी करणाचे काम पाटील कन्स्ट्रक्शन या कंपनी कडून होत असून या निकृष्ट दर्जाच्या कामाची गुणवत्ता तपासून कंत्राटदारांविरूद्ध  व रस्त्याच्या कामावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर गुन्हे  दाखल करण्यात यावे

मालेगाव (जिल्हा नांदेड) : मालेगाव येथून जाणाऱ्या कल्याण ते निर्मल या 222 महा मार्गाचे चौपदरीकरणाचे काम पाटील कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून होत असून या निकृष्ट दर्जाच्या कामाची गुणवत्ता तपासून कंत्राटदारांविरूद्ध  व रस्त्याच्या कामावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर गुन्हे  दाखल करण्यात यावे. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मालेगाव येथील महामार्गावर शेकापचे जिल्हाध्यक्ष शुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. दहा) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्रीय रस्ते  वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

मालेगाव येथून 222 या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू असून सदरील काम पाटील कन्स्ट्रक्शनकडून होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे काम पूर्ण होण्या अगोदर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची गुणवत्ता नियत्रन मंडळाकडून तत्काळ तपासणी करण्यात यावी व पाटील कन्स्ट्र्शन प्रा. ली. पुणे व संबंधित कामावरील अभियंते आणि कंत्रादारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यावेळी वाहतूक ठप्प झाली होती.

हेही वाचा  नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन झाले कोरोनामुक्त -

यांची होती उपस्थिती 

आंदोलकांवर यावेळी विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात पिंटू तारु, बंटी शेळके, रोहन गायकवाड, धनंजय घोडके, मारोती शिंदे, श्रीकांत कांबळे, पवान कांबळे, कैलास वाघमारे, सूरज हनुमंते, स्वप्नील खंदारे, पांडुरंग वालमरे, प्रकाश अटकोरे, रघुनाथ खंदारे, सिद्धार्थ अटकोरे, आकाष साखरे, सोनू गायकवाड यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Block PWP road in Malegaon, file charges against contractors, engineers nanded news