esakal | नांदेड ब्रेकींग : कोरोना बाधीत ३२ तर ३० रुग्ण बरे, दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ७७५ वर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आजच्या अहवालात एकूण २५५ अहवालापैकी १८२ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील एकुण  बाधितांची संख्या आता ७७५ एवढी झाली आहे. यातील ४६९ बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 

नांदेड ब्रेकींग : कोरोना बाधीत ३२ तर ३० रुग्ण बरे, दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ७७५ वर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड जिल्ह्यात शुक्रवार (ता. १७) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ३२ व्यक्ती बाधित तर दोन बाधितांचा मृत्यू झाला. यात दोन्ही पुरुषांचा समावेश आहे. आजच्या अहवालात एकूण २५५ अहवालापैकी १८२ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील एकुण  बाधितांची संख्या आता ७७५ एवढी झाली आहे. यातील ४६९ बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 

आज १७ जुलै रोजी ३० बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील दोन बाधित,   मुखेड कोविड केअर सेंटर येथील १४, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील आठ बाधित, खाजगी रुग्णालयातधित     संदर्भीत झालेले एक बाधित असे एकुण ३० बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 
 
दोन बाधीत पुरुषांचा मृत्यू 

मंगळवार १७ जुलै रोजी रात्री कावी (ता. जिंतूर) परभणी येथील ७० वर्षीय पुरुष आणि कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील ६६ वर्षीय पुरुषाचा उपचारा     दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या ४२ एवढी झाली आहे. 

हेही वाचाशिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन
 
या भागातील रुग्ण बाधीत

नवीन बाधितांमध्ये नांदेडच्या खालसा काॅलनी एक, देगलूर नाका एक, प्रकाशनगर एक, प्रेमनगर दोन, विष्णूनगर एक, दुलेशहा रहेमाननगर ताहेर   किराणाजवळ एक, पावडेवाडी नाका एक, फुलवळ ता. कंधार एक, काकांडी वाडी (ता.मुखेड) एक, मुखेड एक, कुंटूर ता. नायगाव पाच, पटेलनगर धर्माबाद एक, गुजराती काॅलनी धर्माबाद दोन, धर्माबाद एक, कासराळी ता. बिलोली एक, गुजरी ता. बिलोली एक, नागोबा मंदीर ता. देगलूर एक, बालाजी झेंडा ता. देगलूर दोन, टाकळी ता. देगलुर एक, आनंदनगर ता. देगलूर एक, देगलूर दोन, तोफखाना रेल्वेस्टेशन रोड हिंगोली एक, गंगाखेड जिल्हा परभणी एक.

आज रोजी 377 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले

आज रोजी २६४ पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील २० बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात १० महिला बाधित व १० पुरुष बाधित   आहेत. आज रोजी 377 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होतील.

बाधितांवर येथे आहेत उपचार

आज रोजी एकुण ७७५ बाधितांपैकी ४२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ४६९ बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.      उर्वरीत २६४ बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ६७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ६४,   मुखेड कोविड केअर सेंटर येथे २०, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १४, जिल्हा रुग्णालय येथे आठ, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १२, मुदखेड     कोविड केअर सेंटर येथे पाच, गोकुंदा किनवट कोविड केअर सेंटर येथे दोन, हदगाव कोविड केअर सेंटर येथे एक, देगलूर कोविड केअर सेंटर येथे १७ बाधित, माहूर कोविड केअर सेंटर एक बाधित तसेच नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात ४० बाधित व्यक्ती उपचार घेत असून सहा बाधित औरंगाबाद तर एक निझामाबाद येथे संदर्भित झाले आहेत. 

येथे क्लिक कराकर्टुल्याची भाजीशेती ठरते वरदान

कोरोना मिटर

सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार १३७,
घेतलेले स्वॅब- ९ हजार ५८२,
निगेटिव्ह स्वॅब- ७ हजार ६१९
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या-३२
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ७७५,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- ३०,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- १०,
मृत्यू संख्या- ४२,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ४६९,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- २६४,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या ५२३ एवढी संख्या आहे.