esakal | Nanded Breaking : जम्मुचे दोन यात्रेकरु पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ४० 
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

शनिवारी ५४ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामध्ये ५५ व ५७ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

Nanded Breaking : जम्मुचे दोन यात्रेकरु पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ४० 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जम्मू कश्मीर येथून नांदेडला गुरुद्वारा दर्शनासाठी आलेल्या दोन यात्रेकरूंना ‘कोरोना’ची बाधा झाल्याचे शनिवारी (ता. नऊ मे २०२०) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून समोर अले. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४० झाली असून, चौघांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

गुरुवारी (ता.आठ) नगिनाघाट परिसरातील ६३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी शनिवारी ५४ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामध्ये ५५ व ५७ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.  ४९ जणांचे अहवाल निगेटीव्ह तर तीन जणांचे अनिर्णित आहेत.  होळी सणादरम्यान नांदेडमधील होला महल्ला उत्सवासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून शीख यात्रेकरू नांदेडमध्ये दाखल झाले होते.

हेही वाचा - फरार पॉझिटीव्ह दुसरा रुग्ण पोलिसांच्या ताब्यात

मात्र, इतर देशात कोरोनाची लागण वाढत असल्याने संपूर्ण भारतात (ता.२४) मार्च २०२० रोजी देश लॉकडाउन केला. परिणामी सुमारे चार हजार यात्रेकरू नांदेडला अडकून पडले होते. महाराष्ट्र व पंजाब सरकारच्या पुढाकारातून या भाविकांना काही दिवसांपूर्वीच पंजाबला पोचवण्यात आले. अजूनही इतर राज्यांतील यात्रेकरू गुरुद्वारा परिसरामध्येच अडकून आहेत.  

नांदेडला अडकलेल्या यात्रेकरूंची जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळो वेळी आरोग्य चाचणी व स्क्रिनिंग तपासणी करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. परंतु येथून पंजाबला गेल्यानंतर बरेच प्रवासी कोरोनाग्रस्त निघाल्याने नांदेडला त्यांच्या संपर्कात आलेल्या व येथे थांबलेल्या यात्रेकरू व इतर व्यक्तींचे स्वब घेणे सुरू आहे.

हे देखील वाचलेच पाहिजे - शासनाच्या चुकीच्या नियोजनाने मानवतेचा बळी - सुरेश गायकवाड

नगिनाघाट व आसपासच्या परिसरातून आतापर्यंत शंभरहून अधिक व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून या परिसरात थांबलेले जवळपास ३० जण आतापर्यंत कोरोना बाधीत झाले आहेत. यामुळे प्रशासनाकडून या परिसरात बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वब घेण्याची मोहिम अधिक तिव्र प्रमाणात सुरू केली आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन व पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी संत बाबा बलविंदर सिंघजी यांची भेट घेऊन सर्वांना स्वॅब देण्याचे आवाहन करण्याची विनंती केली. त्यानंतर खुद्द विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीदेखील नगिनाघाट येथे जाऊन बाबाजींशी चर्चा केली.

येथे क्लिक करा - Video - ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईची ‘ही’ आहे त्रिसूत्री - डॉ. अंजली डावळे

त्यानंतर जम्मू येथील १४ व हरियाणा येथील दोन यात्रेकरुंनी आपले स्वब आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. याच परिसरात असलेल्या वेगवेगळ्या इमारतीत आरोग्य सेवा पुरवून बाधित व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. 

loading image