Nanded News: किनवटमध्ये वृक्षतोड, राज्य शासनाला नोटीस; राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने ३० दिवसांत मागवला अहवाल

Notice Issued to Maharashtra Government: किनवट तालुक्यातील कथित जंगलतोड प्रकरणाची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने दखल घेत राज्य शासनाला नोटीस बजावली आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

किनवट: तालुक्यात वन विकास महामंडळाकडून ‘थिनिंग’ (विरळणी)च्या नावाखाली सुरू असलेल्या कथित जंगलतोड प्रकरणाची दखल राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने घेतली आहे. आयोगाने राज्य शासनाला नोटीस बजावली असून ३० दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकारामुळे स्थानिक आदिवासींच्या सामुदायिक वन हक्कांवर परिणाम होत असल्याची तक्रार आमदार भीमराव केराम यांनी आयोगाकडे केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com