नांदेड : शेतकऱ्यांना 34 लाखांचा गंडा घालणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे
Friday, 4 December 2020

प्रथम दर्शनी हा 34 लाखाचा आकडा सांगितला जात असला तरी त्याची व्याप्ती मोठी असू शकते. या प्रकरणी काचावार बंधू व त्याच्या दोन मुलांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : शेतकऱ्यांकडून शेतमाल घेऊन लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतात आलेल्या शेतमालाला मार्केटमध्ये जास्तीचा भाव फेकून देतो असे आमिष दाखवून वाजेगाव भागातील शिवम ट्रेडर्स काचावार यांनी शेतकऱ्यांना सुमारे 34 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

प्रथम दर्शनी हा 34 लाखाचा आकडा सांगितला जात असला तरी त्याची व्याप्ती मोठी असू शकते. या प्रकरणी काचावार बंधू व त्याच्या दोन मुलांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्यानंतर काचावारने शिवम ट्रेडर्सला टाळे ठोकून पळ काढला आहे. वाजेगाव भागात यांचे दुकान आहे. बी- बियाणे, खते, औषधे खरेदी विक्री तसेच अंबुजा कंपनीचे सिमेंट विक्रीचा व्यवसाय करतात. दत्तात्रय महादेव काचावार व त्यांचे बंधू दिगंबर माधव काचावार तसे अक्षय दत्तात्रेय काचावार, अंकुश दत्तात्रय काचावार हे दुकानातील व्यवहाराचे कामकाज पाहतात. अनेक वर्षापासून काचावार यांचे दुकान असल्याने त्यांची वाजेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांची ओळख होती. 

हेही वाचानांदेड जिल्ह्यात 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत -

त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता. परंतु त्याच विश्वासाला तडा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. वांगी येथील शेतकरी सुरेश सुदाम जाधव या शेतकऱ्यांसोबत घनिष्ठ संबंध निर्माण केले. जाधव यांनी शेतातील पिकलेले सोयाबीन, हरभरा, तूर, ज्वारी इत्यादी शेतमालाची किंमत जवळपास वीस लाख 61 हजार रुपये एवढी होती. विशेष म्हणजे त्यानंतर जशी गरज पडेल तसे पैसे उचल करत होते. वाजेगाव काढून शिवम ट्रेडर्स या दुकानाकडे गेले असता दुकानाला कुलूप लावून काचावर गायब झाल्याचे समजले. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकात दत्तात्रय काचावार, दिगंबर काचावार, अंकुश काचावार, अक्षय काचावार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान काचावार यांनी वांगी येथील शेतकरी संतोष विठ्ठल जाधव यांच्या सोयाबीनचे एक लाख रुपये, अर्धापूर तालुक्यातील शहापूर येथील विक्रम तुकाराम पिंपळगाव यांचे एक लाख 40 हजार, तुप्पा येथील पंडितराव महादेव कदम यांचे दोन लाख 29 हजार, शहापूर येथील राधाजी कामाजी भेगडे यांचे तीन लाख 55 हजार रुपये हळद, नांदेड तालुक्यातील नागापूर येथील ज्ञानेश्वर आनंदराव मस्के यांचे दोन लाख 25 हजार रुपये किमतीचे सोयाबीन, गजानन लालबा मस्के यांचे तीन लाख रुपये किमतीचे सोयाबीन, मुदखेड तालुक्यातील शिखाचीवाडी येथील बाबाराव पाटील खानसोळे तसेच तक्रार यांचे वीस लाख रुपये एकूण 34 लाख रुपये किमतीचा माल विकला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A case has been registered against shopkeepers who robbed farmers of Rs 34 lakh nanded news