esakal | नांदेडला दिलासा : कोरोना रुग्णांची संख्या घटली, मात्र एका महिलेचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

११ व्यक्ती बाधित तर एका बाधित महिलेचा मृत्यू झाला. आजच्या अहवालात एकूण २१९ अहवालापैकी १८६ अहवाल निगेटिव्ह आले.

नांदेडला दिलासा : कोरोना रुग्णांची संख्या घटली, मात्र एका महिलेचा मृत्यू 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १६) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ११ व्यक्ती बाधित तर एका बाधित महिलेचा मृत्यू झाला. आजच्या अहवालात एकूण २१९ अहवालापैकी १८६ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या आता ७४३ एवढी झाली आहे. यातील ४३९    बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 

आज १६ जुलै रोजी २७ बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील १७ बाधित,   बिलोली कोविड केअर सेंटर येथील चार, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील एक बाधित, हदगाव कोवीड सेंटरमधील, तसेच जिल्हा कोवीड रुग्णालयातून दोन असे एकुण २७ बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 
 
वाजेगाव येथील ६३ वर्षीय एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू 

गुरुवारी (ता. १६) नांदेड तालुक्यातील वाजेगाव येथील ६३ वर्षीय एका कोरोना बाधित महिलेचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय       विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधित महिलेला उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या ४० एवढी झाली आहे.  

या भागातील बाधीत

नविन बाधितामध्ये वाजेगाव एक, विकासनगर कंधार एक, सिद्धार्थनगर किनवट दोन, भायेगाव रोड देगलूर एक, गोजेगाव ता. देगलूर एक, बापूनगर देगलूर दोन, अशोकनगर मुखेड एक, मुक्रमाबाद एक आणि मोंढा परिसर लोहा असे ११ रुग्ण पाॅझिटिव्ह निघाले.

 २२ बाधितांची प्रकृती गंभीर आहे

आज रोजी २६४ पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील २२ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात १० महिला बाधित व 12 पुरुष बाधित   आहेत. आज रोजी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल शुक्रवारी (ता. १७) संध्याकाळी प्राप्त होतील. 

हेही वाचानांदेड जिल्हा आरोग्य विभागाचा असाही कारभार, स्वॅब अहवालास प्रचंड विलंब

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे

सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार ९९,
घेतलेले स्वॅब- ९ हजार १२१,
निगेटिव्ह स्वॅब- ७ हजार ४३७
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ११
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ७४३,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- १४,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- ४,
मृत्यू संख्या- ४०,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ४३९,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- २६४,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या २९९ एवढी संख्या आहे.

मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्या

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.