
नांदेडचा कोरोना दर घसरला मात्र लसीकरणासाठी नागरिकांची भटकंती
नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी(ता. ११) प्राप्त झालेल्या 2 हजार 49 अहवालापैकी 290 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 167 तर अँटिजेन तपासणीद्वारे (Rtpcr and Antigen Test)123 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर (Nanded corona virus) एकुण बाधितांची संख्या 85 हजार 545 एवढी झाली असून यातील 78 हजार 775 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 704 रुग्ण उपचार घेत असून 181 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Vipin )यांनी केले आहे. Nanded corona rates fall but citizens wander for vaccinations
ता. 9, 10 व 11 मे 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 741 एवढी झाली आहे. ता. 9 मे 2021 रोजी नारायणा कोविड रुग्णालयात उमरी तालुक्यातील शेळगाव येथील 40 वर्षाचा पुरुष, दिनांक 10 मे 2021 रोजी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे हदगाव तालुक्यातील ल्याहारी येथील 55 वर्षाचा पुरुषाचा, नांदेड तालुक्यातील असर्जन येथील 73 वर्षाचा पुरुषाचा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे चैतन्यनगर नांदेड येथील 55 वर्षाची महिला, कंधार तालुक्यातील कौठा येथील 46 वर्षाचा पुरुष, मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथील 60 वर्षाचा पुरुष, अर्धापूर तालुक्यातील मेंढला येथील 50 वर्षाची महिला, किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील 68 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालयात हदगाव तालुक्यातील निवघा येथील 75 वर्षाची महिला तर ता. 11 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे लोहा येथील 35 वर्षाचा पुरुष, ओमकारेश्वरनगर नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष, मुखेड तालुक्यातील डोनगाव येथील 73 वर्षाची महिला, नांदेड तालुक्यातील सुगाव येथील 50 वर्षाचा पुरुष आणि मुखेड तालुक्यातील कमलेवाडी येथील 65 वर्षाचा पुरुषाचा समावेश आहे.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात वीज पडून तिघांचा मृत्यू; १३ जनावरेही दगावली
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 77, बिलोली तालुक्यात 1, कंधार 4, मुदखेड 4, यवतमाळ 1, कर्नाटक 2, नांदेड ग्रामीण 6, देगलूर 1, किनवट 5, मुखेड 18, हिंगोली 1, अर्धापूर 4, हदगाव 8, लोहा 6, हिंगोली 6, तेलंगणा 4, भोकर 7, हिमायतनगर 7, माहूर 1, परभणी 3, आंध्रप्रदेश 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे मनपा नांदेड 23, देगलूर 3, कंधार 30, मुदखेड 2, यवतमाळ 3, नांदेड ग्रामीण 9, धर्माबाद 1, किनवट 5, मुखेड 10, परभणी 1, अर्धापूर 7, हदगाव 5, लोहा 2, नायगाव 3, हिंगोली 1, भोकर 7, हिमायतनगर 3, माहूर 5, उमरी 2, बीड 1 असे एकूण 290 बाधित आढळले.
जिल्ह्यातील 578 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 10, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 196, मांडवी कोविड केअर सेंटर 6, देगलूर कोविड रुग्णालय 2, अर्धापूर तालुक्यांतर्गत 1, उमरी तालुक्यांतर्गत 5, खाजगी रुग्णालय 113, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 17, मुखेड कोविड रुग्णालय 36, मुदखेड कोविड केअर सेंटर 13, किनवट कोविड रुग्णालय 24, कंधार तालुक्यांतर्गत 10, बिलोली तालुक्यांतर्गत 37, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 7, बारड कोविड केअर सेंटर 5, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 5, हदगाव कोविड रुग्णालय 20, लोहा तालुक्यांतर्गत 69, मालेगाव टिसीयू कोविड रुग्णालय 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .
मंगळवारी 4 हजार 704 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 148, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 71, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 93, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 32, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 72, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 46, देगलूर कोविड रुग्णालय 19, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 18, बिलोली कोविड केअर सेंटर 116, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 8, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 15, माहूर कोविड केअर सेंटर 19, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 36, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 25, कंधार कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 36, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, बारड कोविड केअर सेंटर 27, मांडवी कोविड केअर सेंटर 4, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 8, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 17, एनआरआय कोविड केअर सेंटर 37, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 561, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 289, खाजगी रुग्णालय 963 व्यक्ती उपचार घेत आहेत. मात्र जिल्ह्यात लसिकरणासाठी नागरिकांना चांगलीच कसरत कारवी लागत आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोस मिळेनासा झाला.