
Corona Update : नांदेडला शुक्रवारी ५४ कोरोनाबाधित
नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.११) प्राप्त झालेल्या एक हजार ३२२ अहवालापैकी ५४ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या एक लाख दोन हजार ४८४ एवढी झाली असून यातील ९९ हजार ५५३ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला २४४ रुग्ण उपचार घेत असून यात चार बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील ६० वर्षाच्या एका पुरुषाचा गुरुवारी (ता.दहा) उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६८७ एवढी आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा २०, नांदेड ग्रामीण एक, देगलूर पाच, बिदर दोन, धर्माबाद एक, मुदखेड एक, लोहा दोन, किनवट सहा, नायगाव पाच, कंधार दोन, मुदखेड दोन, अमरावती एक, उत्तरप्रदेश एक, औरंगाबाद दोन, परभणी एक, पंजाब एक, आदिलाबाद एक असे एकूण ५४ कोरोनाबाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी दोन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण २८, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १४२, खासगी रुग्णालय पाच असे एकूण १७७ कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी २०, देगलूर कोविड रुग्णालय दोन, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण ८६, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ११७, खासगी रुग्णालय १९, असे एकूण २४४ व्यक्ती उपचार घेत आहेत.
नांदेड कोरोना मीटर
एकुण बाधित : एक लाख दोन हजार ४८४
एकूण बरेः ९९ हजार ५५३
एकुण मृत्यूः दोन हजार ६८७
शुक्रवारी बाधित ः ५४
शुक्रवारी बरे ः १७७
शुक्रवारी मृत्यू ः एक
उपचार सुरु ः २४४
अतिगंभीर प्रकृती ः चार
Web Title: Nanded Corona Update 54 Corona Positive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..