esakal | नांदेड - कोरोना बाधितांची संख्या २१ हजारावर ; शनिवारी ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ३५ रुग्णांना सुटी 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

आजच्या दोन हजार ४८ अहवालापैकी एक हजार ९९१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता २१ हजार २१ एवढी झाली

नांदेड - कोरोना बाधितांची संख्या २१ हजारावर ; शनिवारी ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ३५ रुग्णांना सुटी 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - शनिवारी (ता. १९) कोरोना अहवालानुसार ५५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे २१ तर ॲँटिजेन किट्स तपासणीद्वारे ३४ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या ३५ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या दोन हजार ४८ अहवालापैकी एक हजार ९९१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता २१ हजार २१ एवढी झाली असून यातील १९ हजार ९७० बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण २९४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील १२ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ५६२ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

हेही वाचा- मातृवंदन योजनेतून गर्भवतींचे पोषण, ५३ हजार महिलांना २१ कोटींचा मिळाला लाभ​

एकूण ५५ बाधित आढळले

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी आठ, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण सात, देगलूर एक, बिलोली एक, हदगाव एक, जिल्हा शासकीय रुग्णालय आठ, लोहा दोन, धर्माबाद तीन, खासगी रुग्णालय चार असे एकूण ३५ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. शनिवारी बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २७, कंधार दोन, हिंगोली सहा, माहूर एक, मुदखेड एक, भोकर पाच, देगलूर तीन, नागपूर एक, नांदेड ग्रामीण एक, बिलोली एक, हदगाव चार, लोहा दोन, निजामाबाद एक असे एकूण ५५ बाधित आढळले. 

हेही वाचा- नांदेड : मोक्कातील आरोपी पोलिस कोठडीत, जुना मोंढा परिसरात केला होता गोळीबार​

रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या 

जिल्ह्यात २९४ बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २५, जिल्हा शासकीय रुग्णालय १६, जिल्हा रुग्णालय (नवी इमारत) २२, मुखेड आठ, देगलूर आठ, हदगाव १५, किनवट तीन, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १४३, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ३०, हैदरबाद येथे संदर्भीत एक, औरंगाबाद येथे संदर्भित एक, खासगी रुग्णालय २२ आहेत. शनिवारी (ता. १९) रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. विष्णुपूरी शासकीय रुग्णालय १६६, जिल्हा रुग्णालय ७० एवढी आहे. 

कोरोना मीटर 

शनिवारी पॉझिटिव्ह - ५५ 
शनिवारी कोरोनामुक्त - ३५ 
शनिवारी मृत्यू - शुन्य 
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २१ हजार २१ 
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- १९ हजार ९७० 
एकूण मृत्यू संख्या-५६२ 
शनिवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ४४६ 
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- २९४ 
शनिवार रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले -१२ 
 

loading image